शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्ट, टेक डेटा कंपन्यांतर्फे पुण्यात टेक मार्टचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 21:17 IST

डिजिटल अर्थव्यवस्थेत व्यवसायांना पाठबळ

पुणे : महाराष्ट्रातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच एमएसएमईची परिसंस्था प्रगतीशील ठरत आहे. मायक्रोसॉफ्ट आणि टेक डेटा या टीडी सिनेक्स कंपनीतर्फे २३ नोव्हेंबर २०२२ रोजी पुण्यात टेक मार्टचे आयोजन करण्यात आले आहे. 

शहरातील उद्योगांना तंत्रज्ञानाचे पर्याय, साधने आणि मार्गदर्शन पुरवून साह्य करणे तसेच त्यांच्या आजघडीच्या आणि भविष्यातील अनोख्या गरजा पूर्ण करणे, हा यामागील उद्देश आहे. या ठिकाणी कंपन्यांना आपल्या व्यवसायातील आव्हानांसंदर्भात प्रत्यक्ष आणि ‘वन-टू-वन’ सल्लामसलत करून आपल्या डिजिटल बदलांच्या प्रवासाला वेग देता येईल. या टेक मार्टमध्ये कोलॅबॅरेशन, सेक्युरिटी, प्रोडक्टिव्हिटी, होस्टिंग सुविधा आणि क्लाऊडवरील अॅप्लिकेशन, फायनान्स अॅण्ड ऑपरेशन्स, एचआर आणि अगदी कस्टमर रिलेशन मॅनेजमेंट अशा विविध विषयांवरील पर्याय उपलब्ध असतील. https://smbtechmart.in/ या वेबसाईटवर अधिक माहिती मिळणार आहे. 

मायक्रोसॉफ्ट इंडियाचे कॉर्पोरेट, मीडिअम अॅण्ड स्मॉल बिझनेस विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (कार्यकारी संचालक) समिक रॉय म्हणाले, “मायक्रोसॉफ्टने देशातील अनेक एसएमबीजना क्लाऊडवर जाण्यात साह्य केले आहे. या व्यवसायांना सुरक्षित, वाजवी दरातील आणि वापरण्यास सोपे तंत्रज्ञान आणि पर्याय देऊ करत त्यांना सक्षम करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट सातत्याने गुंतवणूक करत आहे.”एक विश्वासार्ह तंत्रज्ञान नेतृत्व म्हणून मायक्रोसॉफ्टने भारतातील २,००,००० हून अधिक एसएमबी ग्राहकांना सेवा पुरवल्या आहेत. देशभरातील १७,००० हून अधिक भागीदारांच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट या एसएमबीजना साह्य करते. त्याचप्रमाणे, त्यांच्या डिजिटल बदलांच्या संपूर्ण प्रवासात त्यांची आयटीमधील वाटचालीसंदर्भातील धोरणे, खरेदी, डिप्लॉयमेंट आणि व्यवस्थापन यात लवचिकता असेल, याची खातरजमा केली जात आहे.