शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

TCL ने भारतात लाँच केले 3 स्मार्ट MINI LED TV; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 11:49 IST

TCL Smart Tv India: गेमर्सच्या गरजा लक्षात ठेऊन टीसीएलने QLED TV TCL C728 बनवली आहे. यात गेमर्ससाठी 120HZ MEMC आणि ऑटो लो लेटन्सी सपोर्ट देण्यात आला आहे.

TCL ने भारतात नवीन 2021 C स्मार्ट टीव्ही सीरीज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये C825, C728 आणि C725 असे तीन टीव्ही मॉडेल्स सादर करण्यात आले आहेत. यातील C825 हा भारतातील पहिला मिनी एलईडी 4K टीव्ही आहे. या टीव्हीमध्ये एक मॅजिक कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या टीव्ही ब्रँड टीसीएलच्या नवीन टीव्ही सीरिजची माहिती.  (TCL launches three new high-end 4K QLED Smart TVs in India)

TCL C825 

TCL C825 भारतातील पहिला मिनी-एलईडी 4K टीव्ही आहे. चांगली पिक्चर क्वालिटी देण्यासाठी टीसीएल C825 मध्ये हजारो मिनी एलईडी देण्यात आले आहेत. या टीव्हीचा डिस्प्ले 1000 निट्स पीक ब्राइटनेस आणि एक अब्ज कलर्सना सपोर्ट करतो. या अँड्रॉइड 11 आधारित स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी विजन HDR देण्यात आला आहे. यातील 120 हर्ट्ज एमईएमसी सपोर्ट लो फ्रेम रेट असलेले व्हिडिओज देखील हाय फ्रेम रेटमध्ये दाखवू शकतो. यात HDMI 2.1 सह गेम मास्टर फिचर देण्यात आला आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 1080P मॅग्नाटिक मॅजिक कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर आयमॅक्स एन्हान्सड सर्टिफाइड 2.1 इंटीग्रेटेड ONKYO साउंडबार, डॉल्बी अ‍ॅटमॉस असे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. TCL C825 चा 55-इंच मॉडेल 1,14,990 रुपये आणि 65-इंच मॉडेल 1,49,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

TCL C728 

गेमर्सच्या गरजा लक्षात ठेऊन टीसीएलने QLED TV TCL C728 बनवली आहे. यात गेमर्ससाठी 120HZ MEMC आणि ऑटो लो लेटन्सी सपोर्ट देण्यात आला आहे. हा टीव्ही HDMI 2.1  ला सपोर्ट करतो. तसेच यात डॉल्बी विजन आयक्यूला सपोर्टसाठी क्वांटम डॉट टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. अँड्रॉइड 11 आधारित या टीव्हीमध्ये स्मार्ट-स्पिकर मोडसह एक ONKYO साउंड सिस्टम देण्यात आली आहे. C728 च्या 55-इंच व्हेरिएंटची किंमत 79,990 रुपये, 65-इंच व्हेरिएंटची किंमत 1,02,990 रुपये आणि 75-इंच व्हेरिएंटसाठी 1,59,990 रुपये मोजावे लागतील.  

TCL C725 

TCL C725 हा एक महागडा 4K QLED टीव्ही आहे. यात HDR 10+ आणि MEMC सपोर्ट देण्यात आला आहे. यात बिल्ट-इन Onkyo साउंडबार आणि Dolby Atmos चा सपोर्ट देखील मिळतो. या स्मार्ट टीव्हीमध्ये एका व्हिडीओ कॉल कॅमेरा देण्यात आला आहे. C725 ची किंमत 50-इंच मॉडेल 64,990 रुपये, 55-इंच मॉडेल 72,990 रुपये आणि 65-इंच मॉडेल 99,999 रुपये आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड