शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

केवळ १०१ रुपयांत घरी घेऊन जा Vivo चा स्मार्टफोन; दिवाळीनिमित्त जबरदस्त ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 09:28 IST

ऑफरमध्ये ग्राहकाला फक्त १०१ रुपये द्यावे लागतील. यानंतर ते V, X किंवा Y सिरीजचा कोणताही फोन घरी आणू शकतात

मुंबई - चीनी मोबाईल कंपनी Vivo नं दिवाळी ऑफरची घोषणा केली आहे. कंपनीच्या या ऑफरमध्ये X80 Series, V25 Series, Y75 Series, Y35 आणि दुसरे स्मार्टफोन्स डिस्काउंटसह विकणार आहे. Vivo Big Joys Diwali ऑफरला सुरुवात झाली असून येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमच्या पसंतीचा मोबाईल खरेदी करू शकता. Vivo Big Joys दिवाळी दरम्यान स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स, कॅशबॅक आणि एक्सटेंडेड वॉरंटी दिली जात आहे. यामध्ये सर्वात खास गोष्ट म्हणजे तुम्ही Vivo चा स्मार्टफोन फक्त १०१ रुपयांमध्ये घरी आणू शकता. 

Vivo Rs 101 स्मार्टफोन ऑफर काय आहे?ग्राहक केवळ १०१ रुपयांमध्ये Vivo स्मार्टफोन त्यांच्या घरी आणू शकतात. ऑफरमध्ये ग्राहकाला फक्त १०१ रुपये द्यावे लागतील. यानंतर ते V, X किंवा Y सिरीजचा कोणताही फोन घरी आणू शकतात. त्याचे उर्वरित पैसे मोबाईल धारकाला मासिक हप्त्यांमध्ये भरावे लागतील. मात्र याबाबत कंपनीकडून फारशी माहिती देण्यात आलेली नाही. म्हणजेच, कंपनी यावर व्याजदर आकारणार की नाही हे स्पष्ट नाही, आपण जवळच्या रिटेलरकडून अधिक माहिती मिळवू शकता. कंपनी लवकरच EMI बद्दल माहिती शेअर करू शकते असंही सांगितले जात आहे. 

Vivo बिग जॉय दिवाळी ऑफरVivo बिग जॉयज दिवाळी सेलमध्ये अनेक ऑफर्स देत आहे. कंपनीने V, X किंवा Y सीरिज स्मार्टफोन्ससाठी वेगळ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ऑफर कालावधी दरम्यान, ग्राहकाला Vivo X80 किंवा X80 Pro वर ८००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. हा कॅशबॅक ICICI किंवा SBI EMI पर्यायासह उपलब्ध असेल. याशिवाय, तुम्ही पूर्ण रक्कम भरल्यास, एक्स-सीरीज स्मार्टफोनला ६ महिन्यांची अतिरिक्त वॉरंटी मिळेल. Vivo V25 सीरीज खरेदीवर ICICI किंवा SBI EMI पर्यायासह ४००० पर्यंतचा कॅशबॅक दिला जाईल. या फोनवर ६ महिन्यांची अधिक वॉरंटीही दिली जात आहे. Vivo Y सीरीज ग्राहक ICICI किंवा SBI EMI पर्यायासह रु. २००० पर्यंतचा कॅशबॅक घेऊ शकतात. याशिवाय, या सीरिजच्या डिव्हाइसवर Jio डिजिटल लाइफचा १० हजार रुपयांपर्यंतचा फायदा दिला जाईल. Y75, Y35 सारख्या फोनवर ६ महिन्यांची अतिरिक्त वॉरंटी आहे.  

टॅग्स :VivoविवोDiwaliदिवाळी 2022