शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

टॅगचा सोनिक अँगल १ वायरलेस स्पीकर बाजारपेठेत दाखल

By शेखर पाटील | Updated: August 14, 2018 13:12 IST

टॅगच्या सोनिक अँगल १ या स्पीकरचे मूल्य २,४९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल कंपनीच्या ई-स्टोअरसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग या भारतीय कंपनीने सोनिक अँगल १ हा वायरलेस स्पीकर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याला ऑनलाईन पध्दतीमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. टॅगच्या सोनिक अँगल १ या स्पीकरचे मूल्य २,४९९ रूपये असून ग्राहकांना हे मॉडेल कंपनीच्या ई-स्टोअरसह अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून उपलब्ध करण्यात आले आहे. सध्या तरी याच्या ऑफलाईन उपलब्धतेबाबत माहिती देण्यात आलेली नाही. तथापि, लवकरच याला देशभरातील शॉपिजमधूनही सादर करण्यात येईल असे मानले जात आहे. 

स्पीकर ब्ल्यु-टूथच्या मदतीने स्मार्टफोनसह अन्य उपकरणांना कनेक्ट करता येतो. मात्र यासोबत यामध्ये ऑक्झ-इन पोर्टदेखील देण्यात आले आहे. यामुळे याचा वायरयुक्त स्पीकर म्हणूनही वापर करता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यामध्ये अतिशय दर्जेदार बास इफेक्ट प्रदान करण्याची प्रणाली देण्यात आलेली आहे. यातील बॅटरी ही २,२०० मिलीअँपिअर क्षमतेची असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे सात तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. याची डिझाईन ही अतिशय आकर्षक अशी आहे. तर याचे वजन फक्त ३५५ ग्रॅम इतके असल्यामुळे याला कुठेही अगदी सहजपणे नेता येते. अर्थात याचा पोर्टेबल स्पीकर म्हणून वापर करता येणारे आहे. यात दोन स्पीकर्सचा समावेश असून यांच्या मदतीने सुश्राव्य ध्वनीचा आनंद घेता येणार असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

टॅग सोनिक अँगल १  हा स्पीकर आयपीएक्स-५ या मानकाच्या निकषांनुसार उत्पादीत करण्यात आला आहे. अर्थात हे मॉडेल वॉटरप्रूफ आहे. यामुळे याला अगदी भर पावसातही वापरणे शक्य आहे. अलीकडच्या काळात काही स्मार्ट स्पीकरमध्ये डिजिटल व्हर्च्युअल असिस्टंटचा वापर केलेला असतो. या अनुषंगाने यात गुगल असिस्टंट आणि अ‍ॅपलचा सिरी या दोन्ही डिजीटल असिस्टंटचा सपोर्ट प्रदान करण्यात आला आहे. यामुळे गुगल असिस्टंट अथवा सिरीला कुणीही ध्वनी आज्ञावली म्हणजेच व्हाईस कमांड देऊन संगीत ऐकण्यासह विविध फंक्शन्सचा वापर करू शकतात. या स्पीकरमध्ये गुगल होम अथवा अ‍ॅपलच्या होमपॅडइतक्या सर्व सुविधा नसल्या तरी एंट्री लेव्हलचा स्मार्ट स्पीकर म्हणून याचा वापर करता येणार आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान