शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईप एलीट प्रो : जाणून घ्या सर्व फीचर्स

By शेखर पाटील | Updated: October 9, 2017 10:55 IST

स्वाईप कंपनीने आपला एलीट प्रो हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ६,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्याचे जाहीर केले आहे.

स्वाईप एलीट प्रो यात ५ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजे १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले देण्यात आला आहे. १.४ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी आहे. तर मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने हे स्टोअरेज ६४ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यातील बॅटरी २५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. तर हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ६.० मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारा आहे.

स्वाईप एलीट प्रो या स्मार्टफोनमध्ये यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अॅम्बिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. स्वाईप एलीट प्रो हे मॉडेल एंट्री लेव्हल या प्रकारातील आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना स्नॅपडील या शॉपींग पोर्टलवरून सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल