शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

मंदगतीने कार्यरत कम्प्युटरसह संघर्ष करावा लागतो का? अशा प्रकारे वाढवा त्याची कार्यक्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2023 12:31 IST

सर्वेक्षणानुसार ६५ टक्‍के कम्प्युटर वापरकर्त्‍यांना मंदगतीने कार्य करणाऱ्या सिस्‍टम्‍सच्‍या समस्‍येचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आलीये.

कम्प्युटर महत्त्वपूर्ण डिवाईस आहे. याचा आपल्‍या दैनंदिन जीवनावर मोठा प्रभाव आहे, अनेकदा आपण करणाऱ्या दैनंदिन कामांवर परिणाम होतो. सर्वेक्षणानुसार ६५ टक्‍के पीसी वापरकर्त्‍यांना मंदगतीने कार्य करणाऱ्या सिस्‍टम्‍सच्‍या समस्‍येचा सामना करावा लागतो. तसेच सर्वेक्षणामधील ३२ टक्‍के प्रतिसादकांनी तक्रार केली की, मंदगतीने कार्य करणाऱ्या संगणकांचा त्‍यांच्‍या परफॉर्म करण्‍याच्‍या क्षमतेवर परिणाम झाला आहे. 

मंदगतीने कार्यरत संगणकासह संघर्ष करावा लागतो का? तर मग, तो संगणक डावलून नवीन खरेदी करण्‍याची गरज नाही! अधिक खर्च न करता पीसीची कार्यक्षमता वाढवण्‍यासाठी पीसीला अपडेट करण्‍याकरिता काही जलद उपाय पुढे देण्‍यात आले आहेत. 

स्‍टोरेज ड्राइव्‍ह अपग्रेड करा पीसी जलदपणे कार्य करण्‍याचा सर्वात प्रभावी मार्ग म्‍हणजे पीसीमधील स्टोरेज ड्राइव्‍ह अपग्रेड करणे. विद्यमान हार्ड डिस्‍क ड्राइव्‍ह (एचडीडी) मधून अंतर्गत एसएसडीचे अपग्रेड केल्‍यास पीसीची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. एचडीडीच्‍या तुलनेत एसएसडी अधिक जलद आहेत. बजेटनुसार एसएटीए एसएसडी किंवा एसएटीए एसएसडीपेक्षा अधिक जलद असलेल्‍या एनव्‍हीएमई™ पॉवर्ड एसएसडी खरेदी करता येऊ शकतात. 

एसएसडी पॉवर्ड पीसी अधिक टास्‍क्स करण्‍यासाठी उच्‍च गती, जलद बूट टाइम, जलद अॅप लोडिंग टाइम, गेम्‍स लाँच करण्‍याकरिता जलद गती आणि व्हिडिओ एडिटिंग किंवा आरएडब्‍ल्‍यू फोटो एडिटिंग अशा मोठ्या फाइल्‍सचा वापर करणाऱ्या प्रोग्राम्‍समध्‍ये अधिक रिस्‍पॉन्सिव्‍हनेस देईल. अधिक म्‍हणजे, यासाठी कमी ऊर्जेचा वापर होईल, ज्‍यामुळे लॅपटॉपची बॅटरी क्षमता वाढेल. 

तुमच्‍यासाठी उपलब्‍ध अव्‍वल एसएसडी पर्यायांपैकी एक म्‍हणजे डब्‍ल्‍यूडी ब्‍ल्‍यू™ एसएन५७० एनव्‍हीएमई एसएसडी, जी २ टीबी* स्‍टोरेज क्षमतेसह येते. ही शक्तिशाली इंटर्नल ड्राइव्‍ह वेस्‍टर्न डिजिटलच्‍या सर्वोत्तम एसएटीए एसएसडींपेक्षा पाच पट गती देते, ज्‍यामुळे तुम्‍ही तुमच्‍या कल्‍पनाशक्‍तीला वाव देऊ शकता आणि पीसीमध्‍ये व्‍यत्‍यय येण्‍याबाबत किंवा लोड टाइमबाबत चिंता करावी लागणार नाही. पीसी मदरबोर्डला एनव्‍हीएमई तंत्रज्ञानाचा सपोर्ट नसेल तर डब्‍ल्‍यूडी ब्‍ल्‍यू ३डी एनएएनडी एसएटीए एसएसडीचा अवलंब करावा.   

रॅम अपग्रेड करा तुम्‍हाला कन्‍टेन्‍ट तयार करायला व व्हिडिओ एडिट करायला आवडत असेल तर एकूण कार्यक्षमता सुधारण्‍यासाठी रॅण्‍डम-अॅक्‍सेस मेमरी (रॅम) अपग्रेड करणे हा आणखी एक मार्ग आहे. रॅम अपग्रेड मंदगतीने कार्यरत पीसीला त्‍वरित परफॉर्मन्‍स बूस्‍ट देते. मेमरी अपग्रेड्सचा खर्च पीसी व आवश्‍यक मेमरीच्‍या रक्‍कमेवर अवलंबून असतो. व्हिडिओ एडिटिंग किंवा गेमिंग सारख्‍या टास्‍क्‍ससाठी अधिक रॅम क्षमतेची आवश्‍यकता असते, ज्‍यामुळे आऊटपुट उत्तम मिळतो. कॅज्‍युअल वापरासाठी रॅम पार्श्‍वभूमीमध्‍ये अधिक अॅप्‍स कार्यरत राहण्‍याची आणि विनाव्‍यत्‍यय अधिक टॅब्‍स ओपन करण्‍याची सुविधा देते. 

जीपीयू अपग्रेड्स जीपीयू अपग्रेडमुळे प्रगत गेम्‍स किंवा स्‍टॅटिस्टिक्‍स व डेटा माइनिंगसाठी कम्‍प्‍युटेशनली गुंतागूंतीच्‍या प्रोग्राम्‍ससाठी अतिरिक्‍त परफॉर्मन्‍स किंवा कार्यक्षमता मिळते. जीपीयू नॉन-गेमिंग अॅप्‍लीकेशन्‍स, तसेच व्हिडिओ एडिटिंगसाठी देखील उपयुक्‍त आहेत. ते एकाच वेळी मोठ्या प्रमाणात डेटा हाताळणाऱ्या इतर प्रक्रिया कार्यक्षमपणे कार्यान्वित करू शकते. पण, तुम्‍ही प्रोफेशनल गेमर असाल तर दर्जात्‍मक ३डी अॅनिमेशनसाठी ते अपग्रेड केले पाहिजे. जीपीयू खरेदी करताना सर्वोत्तम आऊटपुट्ससाठी मॉनिटरचे रिझॉल्‍यूशन तपासण्‍याची खात्री घ्‍या. सीपीयू जुना असेल तर नवीन ग्राफिक कार्ड प्रोसेसरसह सुसंगत असण्‍याची खात्री घ्‍या. 

*१ जीबी = १ बिलियन बाइट्स आणि १ टीबी = १ ट्रिलियन बाइट्स. ऑपरेटिंग वातावरणानुसार वास्‍तविक युजर क्षमता कमी असू शकते.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान