शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

खूशखबर! आता व्हॉट्सअॅपद्वारे लवकरच पाठवता येणार पैसे

By sagar.sirsat | Updated: August 10, 2017 20:30 IST

डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच पैसै ट्रान्सफर करण्याचं फीचर आणणार आहे

ठळक मुद्देडिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच पैसै ट्रान्सफर करण्याचं फीचर आणणारव्हॉट्सअॅप अन्ड्रॉइड 2.17.285 बीटा व्हर्जनमध्ये पेमेंट फीचरसाठी ऑप्शन देण्यात आलं आहेव्हीचॅट आणि हाईक मेसेजिंग यासारखे अॅप पहिल्यापासूनच पेमेंट सर्विसला सपोर्ट करतात.व्हॉट्सअॅपच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप पेमेंट आणि प्रायव्सही पॉलीसी स्विकारण गरजेचं असणार आहे. 

मुंबई, दि. 10 - डिजिटल इंडियाकडे वाटचाल करणा-या भारतात इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप लवकरच पैसै ट्रान्सफर करण्याचं फीचर आणणार आहे. हे फीचर युझर्सना लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅपबाबत वेळोवेळी माहिती लिक करणा-या @WABetaInfo या आयडीवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप अॅन्ड्रॉइड 2.17.285 बीटा व्हर्जनमध्ये पेमेंट फीचरसाठी ऑप्शन देण्यात आलं असून ते अजून लपवून ठेवण्यात आलं आहे. 

@WABetaInfo ने पेमेंट फीचरसोबत एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून  युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) द्वारे एका बॅंकेतून दुस-या बॅंकेत तात्काळ पैसे ट्रान्सफर करता येणं शक्य होणार आहे. ज्याप्रमाणे इंस्टंट मेसेज डिलीव्हर होतात त्याचप्रमाणे दोन खाताधारकांमध्ये पैसे ट्रान्सफर करता येतील असं सांगितलं जात आहे. व्हॉट्सअॅपच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप पेमेंट आणि प्रायव्सही पॉलीसी स्विकारण गरजेचं असणार आहे. 

वीचॅट आणि हाईक मेसेजिंग यासारखे अॅप पहिल्यापासूनच पेमेंट सर्विसला सपोर्ट करतात. परंतू जर व्हॉट्सअॅपने ही सेवा सुरू केली तर याचा सर्वात जास्त फायदा व्हॉट्सअॅपलाच होणार आहे. कारण व्हॉट्सअॅप भारतामध्ये सर्वांत जास्त लोकप्रिय आहे आणि 20 कोटी पेक्षाही जास्त युजर्स आहेत.यापूर्वी  व्हॉट्सअॅपने जून महिन्यात इंस्टंट पेमेंट सर्विस सुरू करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एनपीसीआयसारखी वित्तीय संस्थांशी बोलणी केलयाचं वृत्त आलं होतं.

2016 मध्ये आरबीआयचे पूर्व गव्हर्नर रघुराम राजन यांनी यूपीआय सर्विसची सुरूवात केली होती. यामुळे मोबाइल युझर्स या पद्धतीचा वापर करुन दोन बँका दरम्यान निधी ट्रांसफर करू शकतो.