शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच विवोचा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरयुक्त स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: June 4, 2018 17:30 IST

विवो कंपनी पुन्हा एकदा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन सादर करणार असून याचा टिझरदेखील जाहीर करण्यात आला आहे.

विवो कंपनी पुन्हा एकदा इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन सादर करणार असून याचा टिझरदेखील जाहीर करण्यात आला आहे. विवो कंपनीने अलीकडेच विवो एक्स-२१ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. मात्र यातील सर्वात लक्षवेधी फिचर म्हणजे इन-डिस्प्ले अर्थात डिस्पलेखालीच देण्यात आलेले फिंगरप्रिंट स्कॅनर होय. यानंतर ही कंपनी पुन्हा एकदा याच प्रकारातील फिंगरप्रिंट स्कॅनर असणारा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारणार आहे. १२ जून रोजी याला चीनमध्ये सादर करण्यात येणार असून याबाबत विवो कंपनीने एक टिझरदेखील जारी केला आहे. तसेच अलीकडेच गीकबेंच या स्मार्टफोनच्या विविध फंक्शन्सचे बेंचमार्कींग करणार्‍या संकेतस्थळावरही याची लिस्टींग करण्यात आली आहे. यातून या आगामी मॉडेल्सचे विविध फिचर्स जगासमोर आले आहेत. 

यानुसार हा आगामी स्मार्टफोन 'विवो-नेक्स' (vivo nex) या नावाने सादर करण्यात येणार आहे. या वर्षाच्या प्रारंभी झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये विवोने अपेक्स या नावाने एक कन्सेप्ट फोन प्रदर्शीत केला होता. याचीच व्यावसायिक आवृत्ती म्हणजे विवो-नेक्स असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये फुल व्ह्यू या प्रकारातील डिस्प्ले असून यामध्ये वरील बाजूस नॉच नसेल अशी माहिती आता समोर आली आहे.याला दोन व्हेरियंटमध्ये सादर करण्यात येणार असून एकात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन ८४५ तर दुसर्‍यात स्नॅपड्रॅगन ७१० प्रोसेसर दिलेला असेल. या दोन्ही मॉडेल्समध्ये अनुक्रमे ८ व ४ जीबी रॅम दिलेले असेल. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियो या आवृत्तीवर चालणारे असेल. यातील कॅमेर्‍यांची अचूक माहिती अद्याप जाहीर झालेली नाही. तथापि, यामध्ये पॉप-अप या प्रकारातील फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तर याच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असू शकतो. यातील बॅटरी नेमकी किती क्षमतेची असेल याची माहिती मिळाली नसली तरी यात क्वॉलकॉमच्या क्विकचार्ज ४+ या तंत्रज्ञानाचा सपोर्ट असेल असे मानले जात आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल