शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लवकरच येणार बिक्सबीवर आधारित स्मार्ट स्पीकर

By शेखर पाटील | Updated: December 19, 2017 15:59 IST

सॅमसंग कंपनी लवकरच आपल्या बिक्सबी या व्हर्च्युअल असिस्टंटवर आधारित स्मार्ट स्पीकर जागतिक बाजारपेठेत उतारण्याची शक्यता आहे.

सध्या जगातील बहुतांश टेक कंपन्यांमध्ये स्मार्ट स्पीकरच्या क्षेत्रात चुरस सुरू असल्याचे दिसून येत आहे. गुगल असिस्टंटवर आधारित गुगल होम व अमेझॉनच्या अलेक्झावर आधारित इको मालिका यांच्यात आधीच तुंबळ लढाई सुरू आहे. तर अ‍ॅपल कंपनी आपला होमपॉड हा सिरी या व्हर्च्युअल असिस्टंटचा सपोर्ट असणारा स्मार्ट स्पीकर लवकरच लाँच करणार आहे. यामध्ये आता सॅमसंग कंपनीदेखील उडी घेणार असल्यामुळे ही स्पर्धा अजूनच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत ब्लूमबर्गमध्ये सविस्तर वृत्तांत देण्यात आला आहे. यानुसार पुढील वर्षाच्या पूर्वार्धात सॅमसंगचा स्मार्ट स्पीकर बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे.खरं तर आपण ध्वनी आज्ञावलीच्या युगात केव्हाचाच प्रवेश केला आहे. स्मार्ट स्पीकर हा तर प्रारंभ आहे.  लवकरच आपल्या घरातील सर्व उपकरणांना व्हाईस कमांडच्या मदतीने कार्यान्वित करता येणार आहे. तसेच ही सर्व उपकरणे एका स्मार्ट होम प्रणालीशी संलग्न होणार आहेत. याचा विचार करता सॅमसंगच्या स्मार्ट स्पीकरकडे टेकविश्‍वाचे लक्ष लागून आहे.

सॅमसंगने आपल्या बिक्सबी या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटला कंपनीच्या सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस, गॅलेक्सी नोट ८ तसेच काही फ्लॅगशीप मॉडेल्समध्ये प्रदान केले आहे. तर ऑक्टोबर महिन्यातच बिक्सबी २.० अर्थात याची नवीन आवृत्ती सादर केली आहे. या माध्यमातून बिक्सबीचा स्मार्टफोन व टॅबलेटच्या पलीकडे विस्तार करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेषत: स्मार्ट होममधील विविध उपकरणे या असिस्टंटने कार्यान्वित होतील असे सॅमसंग कंपनीने जाहीर केले आहे. यामुळे बिक्सबी हा असिस्टंट टिव्ही, फ्रिज, स्पीकर आदींसह घरातील अन्य उपकरणांमध्ये देण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा हा सॅमसंगच्या स्मार्ट स्पीकरचा असेल असे ब्लूमबर्गच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानsamsungसॅमसंग