शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सोशल अ‍ॅप्सचा ‘फास’ दिवसेंदिवस घट्ट होतोय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 05:58 IST

पालकांनो सावधान : अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक, कोवळ्या वयात हाती फोन आल्याचा परिणाम

मुंबई : टिक-टॉक अ‍ॅपवर व्हिडीओ टाकण्यास विरोध केल्याने, सोमवारी भोईवाड्यात १५ वर्षीय मुलीने वडिलांच्या वाढदिवशीच आत्महत्या केली. या प्रकारामुळे किशोरवयीन मुलांवर समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. कोवळ्या वयातच हातात स्मार्ट फोन आल्यामुळे सोशल मीडियाच्या जाळ्यात अल्पवयीन मुले भरकटताना दिसत आहेत. फसवणुकीबरोबरच सायबर गुन्ह्यांतही मुले ‘सॉफ्ट टार्गेट’ ठरत आहेत. शिवाय विविध अ‍ॅप्सचा ‘फास’ही दिवसेंदिवस घट्ट होत असून, यामध्ये दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

फेसबुक, इंस्टाग्राम, युट्युब या सोशल साइट्सह टिक-टॉक, माय फोटोज, लाइक व्हिडीओ, वी लाइक, टिंडर सारख्या अनेक अ‍ॅप्सना मुले पसंती देत आहेत. दिवसभरात नवनवीन कपडे बदलायचे, मेकअप करून वेगवेगळे व्हिडीओ शेअर करण्याचे त्यांना जणू व्यसनचजडले आहेत. अनेकदा या फोटो, व्हिडीओचा ठग मंडळी फायदा उचलतात.भोईवाडा येथे आत्महत्या केलेल्या मुलीलादेखील टीक-टॉकवर व्हिडीओ टाकण्याची सवय लागली होती. दिवसाला ५ ते ६ वेळा वेगवेगळे व्हिडीओ करून ती पोस्ट करत असे. वडिलांच्या वाढदिवशीही ती प्रत्येक्ष क्षण व्हिडीओ करून पोस्ट करत असल्याने आजीने हटकले. व्हिडीओ करण्यास मज्जाव केला. याच रागात बाथरूममध्ये जाऊन तिने गळफास घेतला. अशा घटनांपासून धडा घेत पालकांनी वेळीच सावध होत, त्यांना चूक काय? बरोबर काय? याची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. दिवसाला अशा स्वरूपाची अनेक प्रकरणे घेऊन पालक मानसोपचार तज्ज्ञांकडे येत असल्याचे डॉ. सागर मुंदडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले....म्हणून गाठतात टोकाचे पाऊलसोशल मीडियावर तत्काळ मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अल्पवयीन मुले त्याकडे ओढली जातात. दिवसभर १० व्हिडीओ, फोटो टाकून त्याला लाइक्स मिळत नसतील, तर नैराश्येत जातात. सहनशक्ती, प्रतीक्षा करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे मुलांची चिडचिड होते, स्वभाव तापट होतो. याच तापट स्वभावात ते टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवायला हवे. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ

परिस्थिती समजून घ्यापालकांनी सुरुवातीपासूनच मुलांच्या प्रत्येक सवयींवर लक्ष ठेवायला हवे. मोबाइलच्या वापरावर निर्बंध आणावे. त्यांना प्रत्येक गोष्टींचा काय आणि कशासाठी उपयोग आहे? याची जाणीव करून द्या. मुलांसाठी काही नियम वेळीच ठरवायला हवेत. ते नियम पालकांनाही लागू होतात. कारण पालकच त्यांचे आयडॉल असतात आणि पाल्य त्यांचेच अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी त्याची काळजी घ्यायला हवी. पाल्यांसोबत संवाद वाढवावा.- उन्मेश जोशी, संचालक, रिस्पॉन्सिबल नेटिजम प्रोजेक्ट

टॅग्स :Social Mediaसोशल मीडिया