शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सेनहैजरचे प्रिमीयम इयरफोन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:42 IST

ध्वनी उपकरणांमधील ख्यातप्राप्त ब्रँड असणार्‍या सेनहैजरने भारतीय बाजारपेठेत मोमेंटम फ्री या नावाने नवीन ब्ल्यु-टुथ इयरफोन्स उपलब्ध केले आहेत

मुंबई - ध्वनी उपकरणांमधील ख्यातप्राप्त ब्रँड असणार्‍या सेनहैजरने भारतीय बाजारपेठेत मोमेंटम फ्री या नावाने नवीन ब्ल्यु-टुथ इयरफोन्स उपलब्ध केले आहेत.वास्तविक पाहता बाजारपेठेत अत्यंत किफायतशीर दरात हेडफोन्स वा इयरफोन्स उपलब्ध आहेत. मात्र सेनहैजर कंपनीने अतिशय उच्च श्रेणीतील मोमेंटम फ्री हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अर्थात यातील फिचर्सदेखील तितक्याच तोलामोलाचे आहेत. हे या कंपनीच्या मोमेंटम या मालिकेतील नवीन प्रॉडक्ट आहे. याचा लूक अतिशय आकर्षक असून याला मजबुतीदेखील प्रदान करण्यात आली आहे. याच्या मागील बाजूस मॅग्नेट देण्यात आले आहे. यामुळे वापरात नसतांना ते एकमेकांना चिपकून राहतात. यामुळे अर्थातच युजर्सची सोय होणार असल्यामुळे हे फिचर उपयुक्त ठरणारे आहे. तसेच याला ठेवण्यासाठी अतिशय सुबक अशी लेदर बॅगदेखील देण्यात आली आहे.

 

सेनहैजरचे मोमेंटम फ्री हे इयरफोन्स युजरच्या स्मार्टफोनला ब्ल्यु-टुथच्या मदतीने कनेक्ट करता येतात. यात इन-लाईन या प्रकारातील रिमोट कंट्रोल प्रदान करण्यात आला आहे. यात ध्वनी कमी-जास्त करण्यासह म्युझिकचा ट्रॅक बदलता येतो. तसेच यात असणार्‍या मायक्रोफोनच्या मदतीने याच्याशी संलग्न असणार्‍या स्मार्टफोनचे कॉल रिसिव्ह करणे शक्य आहे. यामुळे संगीत ऐकण्यासह स्मार्टफोन कॉलींगसाठीही याचा सुलभपण वापर करता येणार आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा एपीटीएक्स तसेच एएसी या कोडेक्सचाही सपोर्ट आहे. यामुळे यामध्ये या फॉर्मेटमधील ध्वनीही ऐकता येणार आहे. यामध्ये अतिशय उत्तम दर्जाची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे सहा तासांचा बॅकअप देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. या मॉडेलचे मूल्य १४,९९० रूपये असून कंपनीच्या ई-स्टोअरवरून ( https://en-in.sennheiser.com/headphones-bluetooth-momentum-free ) याला उपलब्ध करण्यात आले आहे.