शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

आतापर्यंतचा सर्वात वेगवान प्रोसेसरसाठी Qualcomm सज्ज; Snapdragon 898 होणार पुढील महिन्यात लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: November 8, 2021 17:13 IST

Qualcomm Snapdragon 898 Launch: Qualcomm ने डिसेंबरमध्ये Tech Summit चे आयोजन केले आहे. या इव्हेंटमधून कंपनी आपला आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर सादर करू शकते.  

Qualcomm कंपनी प्रोसेसर बनवण्याचे काम करते, ज्यांचा वापर फोन्स, अ‍ॅक्सेसरीज इत्यादीमध्ये केला जातो. कंपनी विविध बजेट आणि प्रोसेसिंग पॉवर असेलेले चिपसेट सादर करते. दरवर्षी कंपनी नवीन आणि सुधारित प्रोसेसर बाजारात घेऊन येते. यावर्षी Qualcomm ने डिसेंबरमध्ये Tech Summit चे आयोजन केले आहे. या इव्हेंटमधून गेल्यावर्षी सादर झालेल्या फ्लॅगशिप प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 888 ची जागा घेणारा नवीन चिपसेट स्नॅपड्रॅगन 898 नावाने लाँच केला जाईल. 

Qualcomm Snapdragon 898 

टिप्स्टर Digital Chat Station ने SD898 चिप असलेल्या एका निनावी फोनचा फोटो शेयर केला आहे. या फोनमध्ये Device Info HW नावाचे बेंचमार्किंग अ‍ॅप दिसत आहे. या फोटोमधून क्वालकॉमच्या आगामी नवीन चिपसेटची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, हा चिपसेट मॉडेल नंबर sm8450 सह बाजारात येईल. तसेच यात ट्राय-क्लस्टर आर्किटेक्चर आहे ज्यात कॉर्टेक्स एक्स2 प्राईम कोर 3.0GHz स्पीडवर काम करतील. 2.5Ghz स्पीडवर चालणारे तीन Cortex-A710 कोर आणि चार Cortex-A510 पॉवर-एफिशिएंट कोर 1.79GHz स्पीडसह देण्यात येतील. सोबत ग्राफिक्ससाठी एड्रेनो 730 जीपीयू देण्यात येईल. तसेच चिपसेटमध्ये स्नॅपड्रॅगन X65 5G असेल, अशी माहिती लीकमध्ये समोर आली होती.  

हा प्रोसेसर लाँच होताच स्मार्टफोन कंपन्या या प्रोसेसरसह येणाऱ्या स्मार्टफोन्सची घोषणा करतील. यात Xiaomi आणि Vivo यांची नावे सर्वात वरती आहेत. या दोन्ही कंपन्या स्नॅपड्रॅगन 898 SoC असलेले फ्लॅगशिप फोन सादर करू शकतात. Xiaomi या चिपसेटचा वापर Xiaomi 12 मध्ये करू शकते. तर Vivo स्नॅपड्रॅगन 898 असलेला फोन NEX सीरिज मध्ये लाँच करू शकते.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान