शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून तीन व्हेरियंटमध्ये मिळणार ऑनरचा हा स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: July 30, 2018 14:45 IST

हुआवेच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी ऑनर ९ एन हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.

हुआवेच्या मालकीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने भारतीय ग्राहकांसाठी ऑनर ९ एन हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल तीन व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. ऑनर ९ एन हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ३जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज (मूल्य ११,९९९ रूपये); ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज (१३,९९९ रूपये) आणि ४ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज (१७,९९९ रूपये) अशा तीन व्हेरियंटमध्ये मिळणार आहे. या तिन्ही मॉडेल्समध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये अतिशय वेगवान असा किरीन ६५९ हा प्रोसेसर दिलेला आहे. ३१ जुलैपासून ग्राहक याला फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करू शकणार आहे.

ऑनर ९ एन स्मार्टफोनमध्ये आयफोन-एक्स या मॉडेलप्रमाणे वरील बाजूस नॉच देण्यात आला आहे. यावर फ्रंट कॅमेरा, इयरपीस आणि सेन्सर्स देण्यात आलेले आहेत. हा डिस्प्ले एज-टू-एज या प्रकारातील असणार आहे. याचे आकारमान ५.८४ इंच व याचे अस्पेक्ट रेशो १९:९ असा आहे. हा फुल एचडी प्लस (१०८० बाय २२८० पिक्सल्स) क्षमतेचा असणार आहे. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर तर पुढे फेस रिकग्नीशन प्रणाली प्रदान करण्यात आलेली आहे.  या स्मार्टफोनच्या मागील बाजूस १३ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असणार आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात १६ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आलेला आहे. याच्या रिअर आणि फ्रंट या दोन्ही कॅमेर्‍यांमध्ये कृत्रीम बुध्दीमत्तेने सज्ज असणारे फिचर्स देण्यात आले आहेत. याच्या मदतीने यात फेस ब्युटीसह विविध मोड दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी दिलेली आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरियोवर आधारित इएमयुआर ८.० या प्रणालीवर चालणारे आहे.  

टॅग्स :technologyतंत्रज्ञान