शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ व एस ८ प्लस झालेत स्वस्त!

By शेखर पाटील | Updated: April 3, 2018 14:39 IST

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनचे मूल्य ५७,९०० रूपये होते.

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि गॅलेक्सी एस ८ प्लस या दोन्ही उच्च श्रेणीतील स्मार्टफोन्सच्या दरांमध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात भारतीय बाजारपेठेत सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि गॅलेक्सी एस ८ प्लस हे स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले होते. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ या स्मार्टफोनचे मूल्य ५७,९०० रूपये होते. आता हे मॉडेल ४७,९९० रूपयात मिळणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हा ६४,९०० रूपये मूल्य असणारा स्मार्टफोन आता ग्राहकांना ५३,९९० रूपयात खरेदी करता येणार आहे. तर १२८ जीबी स्टोअरेज असणारे सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लसचे व्हेरियंट आता ७०,९०० रूपयांऐवजी ग्राहकांना ६४,९०० रूपयात उपलब्ध करण्यात आले आहे. 

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या दोन्ही मॉडेल्समध्ये इन्फीनिटी डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात कडांचा वापर न करता मोठ्या डिस्प्लेचा वापर करता येतो. गॅलेक्सी एस ८ मध्ये ५.८ आणि तर एस ८ प्लस या मॉडेलमध्ये ६.२ इंच आकारमानाचे आणि २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतांचे डिस्प्ले आहेत. हे दोन्ही मॉडेल्स वॉटर आणि डस्टप्रुफ आहेत. यात ऑक्टा-कोअर प्रोसेसर असून तो आधीच्या मॉडेलपेक्षा १० टक्के अधिक गतीमान असणार आहे. दोन्ही मॉडेल्सची रॅम चार जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी इतके असेल. तर गॅलेक्सी एस ८ प्लसमध्ये ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेजचे व्हेरियंटदेखील आहे.  या दोन्ही मॉडेलमध्ये सॅमसंग कंपनीने विकसित केलेला बिक्सी हा व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे.याशिवाय यात फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस रेकग्नीशन आणि फेस रिकग्नीशन या सुविधा आहेत. याच्या मदतीने कुणीही गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या मॉडेल्सला लॉक/अनलॉक करू शकतो. याशिवाय यात सॅमसंग पास या नावाचे पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप असून याच्या मदतीने विविध अ‍ॅप्सच्या पासवर्डचे अधिक चांगल्या पध्दतीने व्यवस्थापन करता येते. यातील मुख्य आणि फ्रंट कॅमेरे अनुक्रमे १२ आणि ७ मेगापिक्सल्स क्षमतांचे असतील. तर दोन्ही मॉडेल्स अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. वायरलेस चार्जिंगसह या दोन्ही मॉडेलमध्ये अनुक्रमे ३००० आणि ३५०० मिलीअँपिअर क्षमतेच्या बॅटर्‍या प्रदान करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान