शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

नवीन वर्षात खिशाला कात्री लागणार; 2025 मध्ये स्मार्टफोन्सच्या किमती वाढणार, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:58 IST

Smartphone Price in 2025: नवीन वर्षात स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागतील.

Smartphone Price in 2025: तुम्ही पुढील वर्षात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. AI फीचर्स असलेले मोबाईल 2024 मध्ये चर्चेत आले, पण हे तंत्रज्ञान मर्यादित डिव्हाईसमध्येच दिले जाते. 2025 मध्ये बहुतांश स्मार्टफोन्समध्ये हे तंत्रज्ञान दिले जाईल, त्यामुळेच या फोन्सची किंमतदेखील वाढणार आहे. AI वैशिष्ट्यांच्या वाढत्या मागणीमुळे, कंपन्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, या दोन्ही आघाडीवर अधिक गुंतवणूक करावी लागत आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या किमतीही वाढणार असून, त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

अॅडव्हान्स्ड कॉम्पोनन्टच्या वाढीव किमती, 5G तंत्रज्ञानातील बदल अन् AI सारख्या फिचर्समुळे फोनच्या किमती वाढतील. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, 2025 मध्ये स्मार्टफोनची जागतिक सरासरी विक्री किंमत 5 टक्क्यांनी वाढेल. पॉवरफूल प्रोसेसर, कॅमेरा आणि AI सारख्या वैशिष्ट्यांसह येणाऱ्या प्रीमियम स्मार्टफोनची वाढती मागणी हे याचे प्रमुख कारण आहे.

AI ची वाढती क्रेझस्मार्टफोनमध्ये जनरेटिव्ह एआयचे एकत्रीकरण वेगाने होत आहे. या फीचरची भर पडल्याने स्मार्टफोन प्रिमियम होत आहेत. ग्राहकांना जनरेटिव्ह एआय सारखे फीचर्स आवडतात. त्यामुळे, स्मार्टफोन उत्पादक चांगल्या CPU, NPU आणि GPU क्षमतेसह प्रोसेसर बनवण्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळेच दरात वाढ होताना दिसत आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, जसजसे आपण एआय स्मार्टफोनच्या युगात प्रवेश करत आहोत, तसतसे जनरेटिव्ह एआयचा ट्रेंड वाढेल आणि यासाठी अधिक किंमत मोजावी लागेल.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान