जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशावर आता मोठा भार पडणार आहे. सॅमसंग, विवो आणि ओप्पो सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या स्मार्टफोनच्या किमतीत तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. काही मॉडेल्सच्या किमती थेट ४,००० रुपयांपर्यंत वाढल्या असून, आगामी काळात हे दर अजून वाढण्याची शक्यता आहे.
सध्या जगभरात 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची मागणी वाढली आहे. यामुळे चिप बनवणाऱ्या कंपन्या स्मार्टफोनसाठी लागणाऱ्या मेमरी चिप्सऐवजी AI चिप्स बनवण्यावर अधिक भर देत आहेत. परिणामी, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान स्मार्टफोन मेमरी चिप्सच्या किमती १२० टक्क्यांनी वाढल्या आहेत.
अमेरिका-इराण तणावाचा फटकाअमेरिका आणि इराणमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. इंधन महागल्याने वाहतूक खर्च वाढला असून, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे फोनच्या पॅकेजिंगसाठी लागणारे प्लास्टिकही महाग झाले आहे.
कोणते फोन किती महागले?
Samsung: कंपनीने आपल्या 'A' सीरिजमधील फोन्सच्या किमतीत ३० ते ३६ टक्क्यांनी वाढ केली आहे. उदा. गॅलेक्सी A57 ची किंमत आता लक्षणीय वाढली आहे.
Vivo: बजेट स्मार्टफोन 'Vivo T4 Lite' ची किंमत ९,९९९ रुपयांवरून थेट १३,९९९ रुपयांवर पोहोचली आहे.
Oppo: ओप्पोच्या अनेक मॉडेल्सवर सरासरी २,००० ते ४,००० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.
मार्केट रिसर्चनुसार, वाढत्या उत्पादन खर्चामुळे कंपन्यांना हा भार ग्राहकांवर टाकणे भाग पडले आहे.
Web Summary : Smartphone prices, especially Samsung, Vivo, and Oppo, jumped up to 40% due to rising memory chip costs driven by AI chip demand and US-Iran tensions disrupting supply chains. Some models increased by ₹4,000, with further rises expected.
Web Summary : स्मार्टफोन की कीमतें, विशेष रूप से सैमसंग, विवो और ओप्पो की, एआई चिप की मांग और अमेरिकी-ईरान तनाव के कारण आपूर्ति श्रृंखला में व्यवधान के चलते 40% तक बढ़ गईं। कुछ मॉडलों में ₹4,000 की वृद्धि हुई, और आगे भी वृद्धि की उम्मीद है।