शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट ग्लासची पाळत; बँक डिटेल्स, खासगी क्षण सर्वकाही कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 06:50 IST

मेटा कंपनीच्या एआय स्मार्ट ग्लासबाबत स्वीडनच्या वृत्तपत्रांनी केलेल्या खुलाशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

लंडन : मेटा कंपनीच्या एआय स्मार्ट ग्लासबाबत स्वीडनच्या वृत्तपत्रांनी केलेल्या खुलाशामुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या अहवालानुसार, स्मार्ट ग्लास वापरकर्त्यांनी रेकॉर्ड केलेले अत्यंत वैयक्तिक आणि संवेदनशील व्हिडीओ कंपनीचे कंत्राटी कर्मचारी पाहत असल्याचे समोर आले आहे. 

हे कर्मचारी एआय सिस्टीमला अधिक सक्षम करण्यासाठी डेटा सॉर्टिंगचे काम करतात, परंतु याप्रक्रियेत त्यांना वापरकर्त्यांची बँक खाती, वैयक्तिक माहिती आणि काही आक्षेपार्ह व्हिडीओ देखील पाहावे लागत आहेत. यानंतर ब्रिटनच्या डेटा सुरक्षा संस्थेने मेटाकडे तातडीने अहवाल मागिततला आहे. 

कसे आहेत मेटाचे स्मार्ट ग्लास?

हे चष्मे विविध ब्रँड्सच्या भागीदारीत बनवले गेले असून, याद्वारे वापरकर्ते नोटिफिकेशन पाहू शकतात, पेमेंट करू शकतात, व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतात व एआय असिस्टंटशी संवाद साधू शकतात. ब्रिटनच्या डेटा सुरक्षा यंत्रणेने मेटाला विचारणा केली असून, वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षेबाबत हमी मागितली आहे.

मेटाची भूमिका

या आरोपांनंतर मेटाने स्पष्टीकरण दिले आहे की, कोणताही डेटा कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे पाठवण्यापूर्वी तो फिल्टर केला जातो. लोकांची प्रायव्हसी सुरक्षित राहावी यासाठी कंपनी कटिबद्ध असल्याचे मेटाने म्हटले आहे, मात्र, समोर आलेल्या अहवालामुळे गोपनीयतेच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काय आहे प्रकरण?

अहवालात असा दावा केला आहे की, केनियासारख्या देशांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी असे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत जे मानसिकदृष्ट्या त्रासदायक होते. अनेकवेळा वापरकर्ते चष्मा काढून ठेवल्यानंतर तो बंद करायला विसरतात, ज्यामुळे काही अत्यंत खासगी व्हिडीओ चुकून रेकॉर्ड होऊन कंपनीच्या सर्व्हरवर जातात. ब्रिटनच्या डेटा सुरक्षा संस्थेने मेटाकडे तातडीने अहवाल मागत कंपनी डेटा सुरक्षा कायद्यांचे पालन करते की नाही, याची चौकशी सुरू केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Meta's smart glasses under scrutiny: Privacy concerns arise over data access.

Web Summary : Meta's smart glasses face scrutiny after reports revealed contract workers accessed sensitive user data, including bank details and private moments. This raises serious privacy concerns, prompting investigations into Meta's data security practices and adherence to data protection laws.
टॅग्स :Metaमेटाtechnologyतंत्रज्ञान