शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सहा जीबी रॅमयुक्त नुबिया झेड 17 मिनी

By शेखर पाटील | Updated: September 15, 2017 11:06 IST

झेडटीई कंपनीने भारतात आपला नुबिया झेड १७ मिनी हा सहा जीबी रॅम असणारा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल अमेझॉन या ई-पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

झेडटीई कंपनीच्या नुबिया झेड १७ मिनी या स्मार्टफोनमध्ये अत्यंत गतीमान असा ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६५३ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम सहा जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १२८ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने २०० जीबीपर्यंत वाढविता येईल. यात ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. अर्थात याच्या मागील बाजूस प्रत्येकी १३ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यातील एक कॅमेरा मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी या प्रकारातील असेल. याच्या मदतीने अतिशय उत्कृष्ट दर्जाची छायाचित्रे काढता येतील असा कंपनीचा दावा आहे. यात अल्ट्रा फास्ट फोकस हे विशेष फिचरदेखील असेल. ते सेल्फीसाठी यात तब्बल १६ मेगापिक्सल्स क्षमतेचा कॅमेरा असेल. 

नुबिया झेड १७ मिनी या स्मार्टफोनमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले असेल. याला मेटलची युनिबॉडी प्रदान करण्यात आली असून फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधादेखील असेल. यात फास्ट चार्जींग असणारी २९५० मिलीअँपिअर प्रति-तास या क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा नुबिया ४.० युजर इंटरफेस असेल.

नुबिया झेड १७ मिनी हा स्मार्टफोन २१,४९९ रूपये मूल्यात उपलब्ध करण्यात आला असून हे मॉडेल ग्राहकांना अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येईल. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान