शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिमकार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल, 'या' वयाच्या लोकांना मिळणार नाही सिम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 22:21 IST

sim cards : नवीन सिम खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ग्राहक अधिग्रहण फॉर्म (CAF) भरावा लागतो. हा सहसा दूरसंचार कंपनी आणि ग्राहक यांच्यात करार असतो

नवी दिल्ली :  भारतातील अल्पवयीन मुलांना सिम कार्ड दिले जाऊ नये, असे दूरसंचार विभागाने (DoT) म्हटले आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, आता 18 वर्षांखालील कोणतीही व्यक्ती देशातील कोणत्याही दूरसंचार ऑपरेटरकडून सिम कार्ड खरेदी करू शकत नाही. दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, अल्पवयीन मुलाला सिम कार्ड विकणे ही दूरसंचार ऑपरेटरची बेकायदेशीर कृती असेल. सरकारच्या या निर्णयाबद्दल सविस्तर जाणून घ्या.. (sim cards should not be issued to minors said department of telecommunications)

CAF फॉर्म भरल्यानंतरच सिम कार्डनवीन सिम खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ग्राहक अधिग्रहण फॉर्म (CAF) भरावा लागतो. हा सहसा दूरसंचार कंपनी आणि ग्राहक यांच्यात करार असतो. या फॉर्ममध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सिम कार्ड खरेदीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे. या व्यतिरिक्त, जर एखाद्या व्यक्तीची मानसिक स्थिती चांगली नसेल, तर त्याला सिम कार्डही विकता येणार नाही.

एका व्यक्तीच्या नाव्यावर किती सिम कार्ड?हा एक अतिशय सामान्य प्रश्न आहे, जो प्रत्येक वेळी विचारला जातो परंतु त्याचे अचूक उत्तर नाही. साधारणपणे असे म्हटले जाते की, एखादी व्यक्ती त्याच्या नावावर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड खरेदी करू शकते, तर असे नाही. एखादी व्यक्ती त्याच्या नावावर जास्तीत जास्त 18 सिमकार्ड खरेदी करू शकते. यापैकी 9 मोबाईल कॉलसाठी आणि इतर 9 मशीन-टू-मशीन (M2M) कम्युनिकेशसाठी वापरले जातील.

फक्त एक रुपयात सिम कार्डअलीकडेच, सरकारने सिमकार्ड घेण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत, त्यानुसार तुम्हाला सिमकार्ड मिळवण्यासाठी फिजिकलऐवजी डिजिटल केवायसी असेल. या प्रकरणात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागणार नाहीत. याशिवाय पोस्टपेड सिमचे प्रीपेडमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणत्याही कागदाची गरज भासणार नाही. नेटवर्क प्रदाता कंपनी अॅपद्वारे वापरकर्ते स्वतः केवायसी करू शकतील आणि यासाठी ग्राहकांकडून फक्त 1 रुपये आकारले जातील.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानbusinessव्यवसाय