शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शाओमी मी मिक्स २च्या मूल्यात कपात

By शेखर पाटील | Updated: January 4, 2018 11:12 IST

शाओमी कंपनीने आपल्या मी मिक्स २ या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची कपात जाहीर केली आहे.

शाओमी कंपनीने आपल्या मी मिक्स २ या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची कपात जाहीर केली आहे. शाओमी कंपनीने गेल्या ऑक्टोबर महिन्यात मी मिक्स २ हे उच्च श्रेणीतील मॉडेल ३५,९९९ रूपये मूल्यात ग्राहकांना फ्लिपकार्टवरून सादर केले होते. आता यात ३ हजारांची कपात करण्यात आली असून ते ३२,९९९ रूपयात खरेदी करता येणार आहे. ही सवलत प्रारंभ फक्त ऑफलाईन युजर्ससाठी प्रदान करण्यात आल्याचे मानले जात होते. मात्र फ्लिपकार्टवरही सध्या याच दरात हे मॉडेल उपलब्ध करण्यात आले आहे. शाओमी मी मिक्स २ स्मार्टफोनमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि २१६० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा आणि १८:९ गुणोत्तर असणारा सुपर अमोलेड फुल स्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे. यात ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर आहे. शाओमी मी मिक्स २ मधील मागच्या बाजूला १२ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. तर यात ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. यात फोरजी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट ७.१ या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा मीआययुआय ९ हा युजर इंटरफेस असेल. क्विकचार्ज ३.० तंत्रज्ञानासह यात ३४०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. शाओमी मी मिक्स २ हे मॉडेल सहा जीबी रॅम आणि ६४, १२८ आणि २५६ जीबी स्टोअरेजच्या तीन पर्यायांमध्ये जाहीर करण्यात आले होते. मात्र यातील ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल