शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

शाओमी मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ बाजारात दाखल

By शेखर पाटील | Updated: September 27, 2017 14:56 IST

शाओमी कंपनीने आपले मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल आधी लाँच करण्यात आलेल्या मी ब्ल्युटुथ स्पीकरची सुधारित आवृत्ती आहे

ठळक मुद्देशाओमी मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ याची डिझाईन अतिशय आकर्षक अशी आहेक्युबिकल आकाराच्या या मॉडेलला अ‍ॅल्युमिनीयम फ्रेम प्रदान करण्यात आली आहेअवघे २३७ ग्रॅम इतके वजन असणार्‍या या मॉडेलमध्ये दोन स्पीकर आणि रिसीव्हर देण्यात आला आहे

शाओमी कंपनीने आपले मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ हे मॉडेल आधी लाँच करण्यात आलेल्या मी ब्ल्युटुथ स्पीकरची सुधारित आवृत्ती आहे. याचे मूल्य २,६९९ रूपये असले तरी ग्राहकांना सध्या हा स्पीकर १,७९९ रूपये या विशेष सवलतीच्या मूल्यात उपलब्ध करण्यात आला आहे. शाओमी इंडियाचे प्रमुख मनूकुमार जैन यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. हा स्पीकर ब्ल्युटुथ ४.२ या प्रणालीच्या मदतीने सुमारे दहा मीटर अंतरापर्यंतच्या उपकरणांना कनेक्ट करणारा आहे. यात ए२डीपी, एव्हीआरसीपी आणि एचएफपी या ध्वनी मानकांवर आधारित स्ट्रीमिंगचा आनंद घेता येणार आहे.

शाओमी मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ याची डिझाईन अतिशय आकर्षक अशी आहे. क्युबिकल आकाराच्या या मॉडेलला अ‍ॅल्युमिनीयम फ्रेम प्रदान करण्यात आली आहे. अवघे २३७ ग्रॅम इतके वजन असणार्‍या या मॉडेलमध्ये दोन स्पीकर आणि रिसीव्हर देण्यात आला आहे. अँड्रॉइड आणि आयओएस अ‍ॅप्लीकेशनच्या मदतीने हा स्पीकर स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो. अर्थात स्मार्टफोनसह अन्य उपकरणांमधील संगीताचा यावर आनंद घेता येतो. यावरून कॉल करण्याची सुविधादेखील देण्यात आली आहे. यासाठी यात इनबिल्ट मायक्रोफोनही दिलेला आहे.

शाओमी मी ब्ल्युटुथ स्पीकर बेसिक २ या मॉडेलमध्ये १,२०० मिलीअँपिअर क्षमतेची लिथियम-पॉलिमर बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल दहा तासांपर्यंत हा स्पीकर वापरता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. ब्ल्युटुथसह यात मायक्रो-युएसबी आणि ऑक्झ-इन पोर्ट हे कनेक्टिव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत. याच्या मदतीने संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, संगीत प्रणाली, एमपीथ्री प्लेअर आदी उपकरणे याला सहजपणे संलग्न करता येतात. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान