शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

सत्या नाडेलांची दुखरी नस कोणालाच दिसली नाही! पण त्यांच्या मुलामुळे सेलेब्रल पाल्सीच्या लाखो रुग्णांना मोठी मदत झाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 20:02 IST

जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरला असेल तर तुमचा झेनमुळे अस्तित्वात आलेल्या फीचर्सशी संबंध आला असेल.

Microsoft कंपनीचे सीईओ सत्या नाडेला (Satya Nadella) यांच्या मुलाचे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी निधन झालं. झेन नडेला या त्यांच्या मुलाला जन्मत: सेलेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) हा आजार होता. कदाचित या बातमीमुळे तुम्हाला झेनविषयी समजलं असेल. परंतु जर तुम्ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरला असेल तर तुमचा झेनमुळे अस्तित्वात आलेल्या फीचर्सशी संबंध आला असेल.  

जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेयर कंपनी मायक्रोसॉफ्टनं दिव्यांग लोकांना आपले प्रोडक्ट्स वापरता यावे म्हणून अनेक फीचर्सचा समावेश आपल्या ऑपरेटिंग सिस्टममध्ये केला. दिव्यांग लोकांसाठी बनवण्यात आलेल्या या फीचर्सना ‘अ‍ॅक्सेसिबिलिटी’ फीचर्स म्हणतात. यात स्क्रीनवरील शब्द वाचून दाखवणे, शब्द मोठे करून दाखवणे आणि लॅपटॉप किंवा कम्प्यूटरची ब्राईटनेस वाढवणाऱ्या फीचर्सचा समावेश आहे.  

हे सर्व फीचर्स ऑपरेटिंग सिस्टम असावेत असं मायक्रोसॉफ्टला का वाटलं? याच श्रेय सत्या नडेलांच्या मुलाला अर्थात झेनला जातं. 28 फेब्रुवारीला जरी झेनचा मृत्यू झाला असला तरी कोट्यवधी लॅपटॉप आणि कम्प्यूटरमध्ये तो जिवंत आहे.  

2014 मध्ये जेव्हा सत्या नाडेला मायक्रोसॉफ्टचे सीईओ बनले तेव्हा कंपनीचे प्रोडक्ट डिजाइन करताना त्यांची विचारसरणी बदलली. तसेच त्यांच्या नेतृत्वाची पद्धत देखील बदलली. ते दिव्यांग लोकांचा विचार करून प्रोडक्ट्स डिजाईन करू लागले. झेनमुले ते स्पेशली एबल्ड लोकांसाठी चांगली सर्विस देण्याचा प्रयत्न करू लागले, अशी माहिती सत्य नडेलांनी 2017 मध्ये एका लिंक्डइन पोस्टमधून दिली आहे.  

आजही मायक्रोसॉफ्टच्या टेक्नॉलॉजीचा वापर करून दिव्यांग लोकांच्या सशक्तीकरणासाठी उपाय शोधण्याचं कमी इंजिनियर्स करत आहेत. याचं एक उदाहरण Microsoft Seeing AI आहे. हे मायक्रोसॉफ्टच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस APIs कोर्टनावर आधारित एक अ‍ॅप्लिकेशन आहे जो दृष्टीहीन लोकांना वस्तू कोणती आहे हे सांगण्यास मदत करतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञान