शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 11:58 IST

Samsung TV outage: सॅमसंग टीव्ही युजर त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर कोणतेही अ‍ॅप उघडू शकत नाहीएत. भारतातही असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना अशा समस्या येत आहेत.

सॅमसंगची स्मार्ट टीव्ही सेवा बंद पडली आहे. यामुळे मोठ्या संख्येने युजर तक्रार करू लागले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, डाऊन डिटेक्टरवर तक्रारींचा पाऊस सुरु झाला आहे. 

सॅमसंगची स्मार्ट टीव्ही सॅमसंगच्या टीव्हीसाठीचे अ‍ॅप आहे. जवळपास ८० टक्के युजरना या अ‍ॅपचा अ‍ॅक्सेस करता येत नाहीय. डाऊन डिटेक्टरवर २५०० हून अधिक जणांनी तक्रार नोंदविली आहे. १३ टक्के लोकांना लॉगिन करता येत नाहीय. सॅमसंगने यावर काहीही स्पष्टीकरण दिलेले नाहीय. 

सॅमसंग टीव्ही युजर त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर कोणतेही अ‍ॅप उघडू शकत नाहीएत. भारतातही असे अनेक वापरकर्ते आहेत ज्यांना अशा समस्या येत आहेत. आउटेजचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु त्याचा मुख्य परिणाम अमेरिकन ग्राहकांवार झाला आहे. लोक सॅमसंगच्या EU कम्युनिटी पेजवर टीव्हीशी संबंधित समस्या देखील सतत शेअर करत आहेत. कोणताही टीव्ही घेतला की त्याची कंपनी अँड्रॉईडवर त्यांचे प्लॅटफॉर्म अ‍ॅप देते. यावरून तुम्ही कंटेंट दाखविणारी अ‍ॅप इन्स्टॉल करून ती ओपन करू शकता. परंतू, सॅमसंगच्याच अ‍ॅपला समस्या असल्याने टीव्ही बंद पडले आहेत. 

सॅमसंगचा सर्व्हर डाउन असल्याने आज रात्री टीव्हीही पाहू शकत नाही, असे एका युजरने म्हटले आहे. तर एकाने सॅमसंगची खिल्ली उडविली आहे. पाच वर्षे जुन्या टीव्हीऐवजी नवीन सॅमसंग टीव्ही खरेदी केला, पण सर्व्हर डाउन असल्याचे लक्षात आले, असे त्याने म्हटले आहे.

टॅग्स :samsungसॅमसंग