शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

सिनेमा हॉलपेक्षा शानदार अनुभव मिळवा टीव्हीवर; Samsung ने लाँच केला 8K डिस्प्ले असलेली Smart TV 

By सिद्धेश जाधव | Updated: April 2, 2022 16:49 IST

Samsung Neo QLED 8K TV जागतिक बाजारात लाँच झाला आहे. यात अनेक दमदार फीचर्स कंपनीनं दिले आहेत.  

Samsung नं काही दिवसांपूर्वी एका इव्हेंटचं आयोजन करून अनेक प्रोडक्टस सादर केले होते. या ‘अनबॉक्स अँड डिस्कव्हर’ नावाच्या कार्यक्रमातून Samsung Neo QLED 8K TV नं देखील पदार्पण केलं आहे. 8K रिजोल्यूशन असलेला शानदार डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचबरोबर आय कम्फर्ट, डॉल्बी अ‍ॅटमॉस 90W चे स्पिकर्स असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.  

Samsung Neo QLED 8K चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Neo QLED 8K TV चा आकार किती मोठा असेल, हे मात्र कंपनीनं सांगितलं नाही. परंतु यात 8K रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले मिळेल. तसेच यात टीव्हीची पिक्चर क्वॉलिटी सुधारण्यासाठी ‘शेप अडॅप्टिव लाईट कंट्रोल’ फीचर देण्यात आलं आहे, जे Quantum Mini LEDs चा वापर करतं. यातील आय-कम्फर्ट मोड तुमच्या डोळ्यांवर टीव्हीचा दुष्परिणाम होऊ देत नाही.  

प्रोसेसिंगसाठी कंपनीनं Neural Quantum Processor चा पार केला आहे. यातील Samsung Smart Hub मध्ये फीचर्स, सेटिंग्स आणि कन्टेन्ट एकाच ठिकाणी मिळतील. गेमिंगसाठी Samsung Neo QLED 8K TV मध्ये चार एचडीएमआय 2.1 पोर्ट्स, Motion Xcelerator Turbo Pro 4K 144Hz गेमिंग, सुपर अल्ट्रावाईड गेम-व्यू आणि गेमबार देण्यात आला आहे. 

फक्त डिस्प्ले नव्हे तर यातील साऊंड क्वॉलिटी देखील शानदार आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये 90W 6.2.4 चॅनेल ऑडियो सिस्टम देण्यात आली आहे. जी नवीन टॉप चॅनेल स्पिकर आणि ‘ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साऊंड प्रो’ सह डॉल्बी अ‍ॅटमॉसला सपोर्ट करते. या टीव्हीमध्ये वायरलेस डॉल्बी अ‍ॅटमॉस फीचर देखील मिळतं. हा टीव्ही सध्या जागतिक बाजारात प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध झाला आहे. परंतु भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.  

 
टॅग्स :samsungसॅमसंगTelevisionटेलिव्हिजन