शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

​सहा जीबी रॅम व ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज स्मार्टफोन

By शेखर पाटील | Updated: January 10, 2018 19:39 IST

सॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.

सॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून २० जानेवारीपासून खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य ३२,९९० रूपये असून ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप असून हे याचे विशेष फिचर आहे. याच्या पुढील बाजूस एफ/१.९ अपार्चर आणि लाईव्ह फोकस या फिचरने सज्ज असणारे १६ व ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी घेता येणार आहे. तर एफ/१.७ अपार्चरसह यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा असेल. युएसबी टाईप-सी चार्जींग प्रणालीसह यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याने कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरता येईल. यात कॉन्टॅक्टलेस मोबाईल पेमेंटसाठी यात सॅमसंग पे ही प्रणाली देण्यात आलेली आहे. याला सॅमसंग गिअर व्हिआर हेडसेटचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे.सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२२२० बाय १०८० पिक्सल्स) सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याची ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असून मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविता येणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. तसेच या स्मार्टफोनमध्ये  अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :samsungसॅमसंग