शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Galaxy Unpacked 2022: सॅमसंग सादर करणार सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन; घरबसल्या होता येणार लाँच इव्हेंटमध्ये सहभागी 

By सिद्धेश जाधव | Updated: February 9, 2022 12:04 IST

Samsung Galaxy Unpacked 2022: सॅमसंगचा हा व्हर्च्युअल रियलिटी इव्हेंट आहे. जो Samsung 837X च्या Decentraland मध्ये होस्ट करण्यात येईल. या इव्हेंटमधून Galaxy S22 Series, Galaxy Tab S8 Series आणि Galaxy Watch सादर केला जाईल.

Samsung Galaxy Unpacked 2022: टेक दिग्गज कंपनी सॅमसंग आज अनेक डिवाइसेज टेक मंचावर सादर करणार आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या मेगा इव्हेंटमधून Galaxy S22 Series, Galaxy Tab S8 Series आणि नेक्स्ट जेनरेशन Galaxy Watch सादर केला जाईल. Samsung Galaxy Unpacked 2022 इव्हेंट Metaverse मध्ये आयोजित केला जाईल. जो सॅमसंगच्या Samsung 837X व्हर्च्युअल  रियालटी प्लॅटफॉर्मवरून लाईव्ह बघता येईल.  

Metaverse मधील इव्हेंट  

हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरु होईल. तुम्ही हा इव्हेंट युट्युबवरून देखील लाईव्ह बघू शकता. तसेच सॅमसंगच्या या व्हर्च्युअल रियलिटी इव्हेंटमध्ये तुम्हाला गेस्ट म्हणून सहभागी होता येईल. Samsung 837X च्या Decentraland मध्ये आयोजित करण्यात आलेला हा इव्हेंट डेस्कटॉपच्या माध्यमातून अटेंड करता येईल. Decentraland सह कनेक्ट केल्यावर युजर्सचा Avatar व्हर्च्युअल 837X बिल्डिंगच्या बाहेर पोहोचेल. त्यांनतर गेटमधून आत गेल्यावर Galaxy S22 Series, Galaxy Tab S8 Series चा लाँच इव्हेंट पाहता येईल.  

Galaxy S22 सीरीजचे लीक स्पेक्स  

Samsung Galaxy S22 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा, Galaxy S22+ मध्ये 6.6 इंचाचा आणि Galaxy S22 Ultra मध्ये 6.8 इंचचा डिस्प्ले मिळेल. परंतु तिन्ही स्मार्टफोनमध्ये Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात येईल, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. पीक ब्राईटनेस मात्र Ultra मध्ये 1,750 निट्स असेल तर Galaxy S22 आणि Galaxy S22+ 1,300 निट्स पीक ब्राईटनेससह येतील. 

Samsung Galaxy S22 सीरीज 4nm प्रोसेसरवर बनलेल्या Exynos 2200 SoC सह सादर करण्यात येईल. सोबत Xclipse GPU मिळेल. काही देशांमध्ये Snapdragon 8 Gen 1 चिपसेट असलेला व्हर्जन येईल. यातील वॅनिला Samsung Galaxy S22 स्मार्टफोन 25W फास्ट चार्ज सपोर्टसह सादर केला जाईल. तर प्लस आणि अल्ट्रा मॉडेल 45W फास्ट चार्जिंगसह येतील.   

Galaxy S22 आणि Galaxy S22+ स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळेल. सोबत 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 30x स्पेस झूम असलेली 10-मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स मिळेल. तर अल्ट्रा मोडले 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 12-मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा, 10-मेगापिक्सल टेलीफोटो कॅमेरा आणि 100x स्पेस झूम असलेल्या 10-मेगापिक्सल पेरिस्कोप कॅमेऱ्यासह बाजारात येईल. Galaxy S22 Ultra स्मार्टफोनमध्ये 40-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल तर Galaxy S22 आणि Galaxy S22+ स्मार्टफोन युजर्सना 10MP वर समाधान मानावं लागू शकतं.   

Samsung Galaxy S22 Series Price in India 

Samsung Galaxy S22 Series ची जागतिक बाजारातील किंमत समोर आली आहे. त्यावरून भारतीय किंमतीचा अंदाज लावता येईल. Galaxy S22 स्मार्टफोनची किंमत 899 डॉलर्स (जवळपास 67,000 रुपये) पासून सुरु होईल. Samsung Galaxy S22+ चा बेस मॉडेल 1099 डॉलर्स (जवळपास 82,000 रुपये) आणि  Galaxy S22 Ultra ची आरंभिक किंमत 1299 डॉलर्स (जवळपास 97,000 रुपये) असू शकते. 

Samsung Galaxy Tab 8 सीरिजचे लीक स्पेक्स  

लीकनुसार, सॅमसंगच्या फ्लॅगशिप टॅबलेट सीरीजच्या बेस मॉडेलमध्ये 11 इंचाची LTPS TFT स्क्रीन मिळेल. जी 2500 x 1600 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. तर Galaxy Tab S8+ मध्ये 2800 x 1752 पिक्सल रिजोल्यूशनसह 12.4 इंचाची AMOLED स्क्रीन मिळेल. तर Galaxy Tab S8 Ultra मध्ये 14.6 इंचाचा AMOLED डिस्प्ले 2960 x 1848 पिक्सल रिजोल्यूशनसह दिला जाऊ शकतो.  

Samsung Galaxy Tab S8 Series मध्ये 16GB पर्यंत RAM मिळू शकतो. सोबत 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात येईल. एवढी मेमरी कमी पडल्यास मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत अतिरिक्त मेमोरी जोडता येईल. या टॅबलेट सीरिजमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसरची पावर मिळू शकते. यात Android 12 आधारित OneUI 4.0 आणि Samsung DEX सपोर्ट मिळेल.  

Samsung Galaxy Tab S8 सीरीजमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 13MP चा प्रायमरी आणि 6MP चा सेकंडरी सेन्सर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ 12MP चा कॅमेरा मिळू शकतो. सीरीजमधील अल्ट्रा मॉडेल दोन फ्रंट कॅमेऱ्यांसह बाजारात येऊ शकतो.   

Galaxy Tab S8 Series च्या बेस मॉडेलमध्ये सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. तर, अन्य दोन मॉडेल इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतील. टॉप मॉडेलमध्ये S-Pen Stylus सपोर्ट देखील मिळेल. Samsung Galaxy Tab S8 मध्ये 8,000mAh ची बॅटरी मिळेल. प्लस मॉडेल 10,090mAh बॅटरीसह तर अल्ट्रा मॉडेल 11,200mAh च्या बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच हे टॅबलेट 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतील.   

हे देखील वाचा:

हे आहेत 6 'बेस्ट' पासवर्ड मॅनेजर अ‍ॅप्स जे तुम्हाला कधीच विसरू देणार नाहीत महत्वाचे लॉगिन डिटेल्स

Samsung च्या चाहत्यांसाठी बॅड न्यूज! आता मिळणार नाही 108MP कॅमेरा असलेला दमदार स्मार्टफोन, ‘हे’ आहे कारण

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान