शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

ऑफिसची कामं करण्यासाठी पावरफुल टॅब हवा? Samsung नं सादर केलेत 4 जबरदस्त Galaxy Tab

By सिद्धेश जाधव | Updated: February 10, 2022 12:29 IST

Samsung Galaxy Unpacked 2022 Event मधून कंपनीनं Samsung Galaxy Tab S8 सीरीज देखील लाँच केली आहे. ज्यात 16GB RAM, 512GB स्टोरेज, 11200mAh बॅटरी आणि ड्युअल सेल्फी कॅमेरा असे फिचर मिळतात.  

Samsung Galaxy Tab S8 Series मध्ये कंपनीनं तीन टॅबलेट लाँच केले आहेत. ज्यात Galaxy Tab S8, Galaxy Tab S8+ आणि Galaxy Tab S8 Ultra लाँचचा समावेश आहे. या तिन्ही टॅबमध्ये 4nm 64-Bit Octa Core प्रोसेसर अँड्रॉइड 12 आणि S Pen सपोर्ट मिळतो. तसेच यात 45W फास्ट चार्जिंग, 3 मायक्रोफोन, कनेक्टिविटीसाठी 5G आणि WiFi सारखे अनेक एकसारखे फीचर्स मिळतात. चला जाणून घेऊया अन्य स्पेक्स.  

Samsung Galaxy Tab S8 चे स्पेसिफिकेशन्स 

Galaxy Tab S8 मध्ये 2560×1600 पिक्सल रिजोल्यूशनसह 11 इंचाचा LPTS TFT डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा टॅब 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. सिक्योरिटी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. यात 8,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. टॅबलेटच्या मागे 13MP AF + 6MP अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला रियर कॅमेरा सेटअप आहे. तर 12MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. 

Samsung Galaxy Tab S8+ चे स्पेसिफिकेशन्स  

Galaxy Tab S8+ मध्ये 2800×1752 पिक्सल रिजोल्यूशनहं 12.4 इंचाचा Super AMOLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळते. इन डिस्प्ले फिगरप्रिंट सेन्सरसह येणार हा टॅब 10,090mAH च्या बॅटरीला सपोर्ट करतो. यात 13MP + 6MP चा रियर कॅमेरा सेटअप आहे. तर व्हिडीओ कॉलिंग 12MP च्या फ्रंट कॅमेऱ्याने करता येईल.  

Galaxy Tab S8 Ultra चे स्पेसिफिकेशन्स  

या टॅबलेट सीरिजचा सर्वात पावरफुल मॉडेल म्हणजे Galaxy Tab S8 Ultra. यात 14.6 इंचाचा मोठा डिस्प्ले 2960×1848 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. यात 16GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे,जी SD कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येते. यात 11,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Tab S8 Ultra मध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. यात 13MP + 6MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी देखली यात 12MP + 12MP चा सेन्सर आलेला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy Tab S8 सीरिजची किंमत 

Samsung Galaxy Tab S8 ची किंमत 699 डॉलर (जवळपास 52000 रुपये) पासून सुरु होते. Galaxy S8+ ची किंमत 899 डॉलर (जवळपास 67000 रुपये) पासून सुरु होते आणि Galaxy S8 Ultra चा बेस मॉडेल 1099 डॉलर (जवळपास 82000 रुपये) मध्ये विकत घेता येईल. भारतीय उपलब्धतेची माहिती मात्र अजून मिळाली नाही.  

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगtabletटॅबलेटAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान