शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लसच्या मूल्यात पाच हजारांची घट

By शेखर पाटील | Updated: August 28, 2017 10:00 IST

सॅमसंग कंपनीने आपल्या सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअरेजच्या व्हेरियंटमध्ये तब्बल पाच हजारांनी घट केल्याचे जाहीर केले आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हे दोन्ही मॉडेल भारतीय बाजारपेठेत या वर्षाच्या मे महिन्यात लाँच करण्यात आले होेते. यातील सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस हे मॉडेल ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज आणि ६ जीबी रॅम व १२८ जीबी स्टोअरेज अशा दोन व्हेरियंटमध्ये भारतीय ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले होते. यातील ६ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूळ मूल्य ७४,९०० रूपये इतके होते. मात्र एका महिन्यातच सॅमसंग कंपनीने यात चार हजार रूपयांची सूट दिल्यामुळे हे मॉडेल ७०,९०० रूपयात मिळू लागले होते. तर आता या मॉडेलमध्ये पुन्हा एकदा पाच हजारांची सूट देण्यात आली असून अर्थातच हा स्मार्टफोन आता ६५,९०० रूपयात मिळणार आहे. आता गमतीची बाब अशी की याच स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅमचे व्हेरियंट फक्त एक हजारांनी कमी म्हणजे ६४,९०० रूपयात मिळत आहे. यामुळे फक्त एक हजार रूपये जास्त खर्च करून कुणीही हायर व्हेरियंट घेऊ शकतो. यामुळे ४ जीबी रॅमच्या व्हेरियंटचे मूल्यदेखील कमी होण्याची शक्यता आहे. सॅमसंग कंपनी येत्या काही दिवसात अलीकडेच लाँच करण्यात आलेले सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत लाँच करणार आहे. या पार्श्‍वभूमिवर सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलमध्ये सूट देण्यात आल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलमध्ये अनेक उत्तमोत्तम फिचर्स आहेत. यामध्ये सॅमसंग कंपनीने विकसित केलेला बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंट प्रदान करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ६.२ इंच आकारमानाच्या आणि क्युएचडी म्हणजेच २९६० बाय १४४० पिक्सल्स क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. यात ऑक्टा-कोअर सॅमसंग एक्झीनॉस ८८९५ प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. ऑप्टीकल इमेज स्टॅबिलायझेशन आणि एफ/१..७ अपार्चरसह यात १२ ड्युअल पिक्सल्सचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात ऑटो-फोकस आणि एफ/१.७ अपार्चरसह ८ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. सॅमसंग गॅलेक्सी एस ८ प्लस या मॉडेलमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर, आयरिस रेकग्नीशन आणि फेस रिकग्नीशन या सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत. याच्या मदतीने कुणीही या मॉडेलला लॉक/अनलॉक करू शकतो. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहेत. वायरलेस चार्जिंगसह या स्मार्टफोनमध्ये ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्ट रेझिस्टंट आहे. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान