शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

Samsung ची बंपर ऑफर, अर्ध्याहून कमी किमतीत मिळतोय Galaxy S23 Ultra स्मार्टफोन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2023 13:34 IST

सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्हाला कमीत कमी किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

नवी दिल्ली-

सॅमसंगचा फ्लॅगशिप स्मार्टफोन तुम्हाला कमीत कमी किमतीत खरेदी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीनं यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च झालेल्या Galaxy S23 सीरिजवर मोठा डिस्काऊंट मिळत आहे. या सीरिजमध्ये कंपनीचे तीन स्मार्टफोन आहेत. यात Galaxy S23, S23 Plus आणि S23 Ultra यांचा समावेश आहे. याच फोन्सवर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. 

स्मार्टफोन्सवर नो-कॉस्ट EMI, एक्स्चेंज बोनस आणि इतर काही फायदे मिळवता येत आहेत. ग्राहकांना १८ हजार रुपयांपर्यंतचा फायदा या बोनस ऑफरमध्ये मिळवता येणार आहे. या सर्व ऑफर्सचा लाभ घेऊन तुम्ही Galaxy S23 Ultra फोन ५९ हजारात खरेदी करू शकता. 

Samsung Galaxy S23 सीरिजवर ऑफर कोणत्या?सॅमसंगच्या Galaxy S23 आणि S23 Plus वर १३ हजार रुपयांचा फायदा मिळवता येईल. तसंच १२ महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI चा पर्याय देखील उपलब्ध आहे. तसंच हा फोन तुम्ही २४ महिन्यांच्या नो-कॉस्ट EMI वर देखील खरेदी करू शकता. ज्याचा दरमहा EMI तुम्हाला ३,१२४ रुपये इतका पडेल. याशिवाय ग्राहकांना ८ हजार रुपयांचा अपग्रेड बोनस दिला जात आहे. 

Galaxy S23 फोन कंपनीनं ७४,९९९ रुपयांमध्ये लॉन्च केला होता. यात 8GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळतो. तर 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ७९,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन चार रंगात उपलब्ध आहे. यात फँटम ब्लॅक, लेवेंडर, ग्रीन आणि क्रीम रंगांचा समावेश आहे. 

Galaxy S23 Plus बाबत बोलायचं झालं तर या फोन कंपनीनं ९४,९९९ रुपयांच्या किमतीवर लॉन्च केला होता. ही किंमत फोनच्या 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर याचं 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत १,०४,९९९ रुपये इतकी आहे. फोन फँटम ब्लॅक आणि क्रीम रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे. 

Ultra वर बंपर ऑफरGalaxy S23 Ultra जवळपास ५९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सॅमसंगच्या या फोनवर १८ हजार रुपये आणि १२ महिन्यांचा नो-कॉस्ट EMI चा पर्याय दिला जात आहे. तसंच १० हजारांचा अॅडिशनल अपग्रेड बोनस दिला जात आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोन