शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
2
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं दिलाय मोठा इशारा 
3
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
4
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
5
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
6
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
"तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
8
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
9
मानव-बिबट्या संघर्षावर सरकारचे निर्णायक पाऊल; मनुष्यहानी रोखायला प्राधान्य, ११ कोटी मंजूर
10
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
11
"होनराव म्हणजे तू मराठी ना? तुझी बायको भैयिणी...", कमेंट वाचून मराठी अभिनेत्याचा संताप, म्हणाला...
12
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
14
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
15
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
16
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
17
Vijay Mallya : 'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
18
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
19
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?

2022 ची होणार धमाकेदार सुरुवात; Samsung Galaxy S21 FE आणि Galaxy S22 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा 

By सिद्धेश जाधव | Updated: November 9, 2021 13:03 IST

Samsung Galaxy S21 FE And Galaxy S22 Launch Date: Samsung Galaxy S21 FE आणि Galaxy S22 सीरीजची लाँच डेट समोर आली आहे. लाँच डेट पाहता कंपनी पुढील वर्षाची दमदार सुरुवात करण्यास सज्ज आहे असे दिसत आहे.  

कमी किंमतीत सॅमसंगचा फ्लॅगशिप अनुभव देणाऱ्या Samsung Galaxy S21 FE ची वाट कंपनीचे चाहते बघत आहेत. गेले कित्येक दिवस लीक आणि रिपोर्ट्समधून या फोनची माहिती मिळाली आहे, परंतु लाँच डेट मात्र अजून समजली नाही. परंतु आता Galaxy S21 FE ची लाँच डेट समोर आली आहे. त्याचबरोबर Samsung Galaxy S22 सीरीजची लाँच डेटचा खुलासा झाला आहे.  

Samsung Galaxy S21 FE लाँच डेट 

Samsung Galaxy S21 FE फोन पुढील वर्षी 4 जानेवारीला लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती टिपस्टर जॉन प्रोसेर यांनी दिली आहे. लाँच नंतर एक आठवड्याने हा फोन विक्रीसाठी उपलब्ध होईल. लीकनुसार 11 जानेवारीपासून विकत घेता येईल.  

Samsung Galaxy S22 Series लाँच डेट  

लीकनुसार, Samsung Galaxy S22 सीरीज 8 फेब्रुवारी, 2021 ला लाँच केली जाईल. लाँचनंतर हा फोन प्री ऑर्डर करता येईल तर 18 फेब्रुवारीपासून हा फोन विकत घेता येईल.  

Samsung Galaxy S21 FE चे स्पेसिफिकेशन्स   

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले पंच होल डिजाईनसह सादर केला जाईल. प्रोसेसिंगच्या बाबतीत या स्मार्टफोनचे फ्लॅगशिप स्टेटस दिसून येते. Galaxy S21 FE मध्ये Qualcomm Snapdragon 888 SoC देण्यात येईल. तसेच फोनमध्ये 6GB RAM आणि Adreno 660 GPU मिळू शकतो.     

Samsung Galaxy S21 FE च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार या स्मार्टफोनमध्ये 12MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 32MP सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तळाला स्पिकर ग्रिल, सिम ट्रे आणि USB Type-C पोर्ट देण्यात येईल. तर डाव्या पॅनलवर पावर बटण असेल. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाईल.    

टेना लिस्टिंगनुसार, Samsung Galaxy S21 FE मध्ये 6.4-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. लिस्टिंगमधून 4,370 mAh च्या बॅटरीची माहिती समोर आली आहे. अलीकडेच समोर आलेल्या FCC आणि 3C सर्टिफिकेशनच्या लिस्टिंगनुसार फोनमध्ये क्रमशः 45 वॉट आणि 25 वॉट फास्ट चार्जिंग असू शकते. गीकबेंचवर Samsung Galaxy S21 FE स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर आणि 8GB रॅमसह लिस्ट झाला होता.    

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान