शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

सॅमसंगचा दमदार 5G फोन लाँचच्या मार्गावर; Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन Amazon India वर लिस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 12:13 IST

Galaxy M52 5G India Launch: Galaxy M52 5G स्मार्टफोन आता Amazon India वर लिस्ट करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी या फोनचा सपोर्ट पेज कंपनीच्या वेबसाईटवर लाईव्ह करण्यात आला होता.

Samsung चा नवीन 5G स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. कंपनीच्या एम सीरिजमधील Galaxy M52 5G स्मार्टफोन आता Amazon India वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून हा फोन अ‍ॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध होईल हे मात्र निश्चित झाले आहे. हा Galaxy M32 5G स्मार्टफोन नंतरचा एम सीरिजमधील दुसरा फोन असेल ज्यात 5G कनेक्टिव्हिटी देण्यात येईल. काही दिवसांपूर्वी या फोनचा सपोर्ट पेज कंपनीच्या वेबसाईटवर लाईव्ह करण्यात आला होता.  

Samsung Galaxy M52 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स   

सॅमसंग गॅलेक्सी एम52 5जी फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. इन्फिनिटी ‘ओ’ डिजाईनसह येणारा हा डिस्प्ले 2400 X 1080 पिक्सल रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात येईल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित सॅमसंगच्या वनयुआय 3.1 वर चालेल. 

Samsung Galaxy M52 5G मध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हा फोन 1TB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्ड सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमधील बॅटरी क्षमतेची माहिती मिळाली नाही. परंतु यात 15वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. या फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64MP चा मुख्य कॅमेरा, 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 5MP चा डेप्थ सेन्सर मिळेल. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड