शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
7
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
8
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
9
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
10
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
11
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
12
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
13
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
14
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
15
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
16
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
17
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
19
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
20
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा

सॅमसंगचा नवीन किफायतशीर 5G Phone भारतात लाँच; 12 5G बँड्ससह आला Samsung Galaxy F42  

By सिद्धेश जाधव | Updated: September 29, 2021 14:45 IST

Budget 5G Phone Samsung Galaxy F42 5G Price in India: सॅमसंग गॅलेक्सी एफ42 5जी चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे.

सॅमसंगने आपल्या 5G Phone च्या ताफ्यात नवीन स्मार्टफोन Samsung Galaxy F42 जोडला आहे. या फोनची किंमत 20,999 रुपयांपासून सुरु होणार आहे. हा फोन 3 ऑक्टोबरला सुरु होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये विकत घेता येईल. या डिवाइसमध्ये 64MP कॅमेरा, 8GB RAM, 90Hz रिफ्रेश रेट आणि 5,000mAh बॅटरी अशा दमदार स्पेक्ससह बाजारात आला आहे.  (Samsung 5G Phone Galaxy F42 5G launched in India with 64MP camera) 

Samsung Galaxy F42 5G ची किंमत 

सॅमसंग गॅलेक्सी एफ42 5जी चे दोन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या छोट्या व्हेरिएंटमध्ये 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते, ज्याची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 22999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung Galaxy F42 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy F42 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेट असलेला हा एक टीएफटी पॅनल आहे. या फोनमध्ये कंपनीने मीडियाटेकचा डायमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा सॅमसंग फोन माली जी57 जीपीयूला सपोर्ट करतो. हा 5G फोन अँड्रॉइड 11 ओएससह वनयुआयवर चालतो.   

या लेटेस्ट सॅमसंग फोनमध्ये 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. या स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.  

Samsung Galaxy Wide5 5G मध्ये सिक्योरिटीसाठी साईड माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देखील देण्यात आले आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे जो बेसिक कनेक्टिविटी फीचर्सला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड