शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या बजेटमध्ये बसतोय का 8GB RAM असलेला Samsung Galaxy A33 5G? किंमत आली समोर  

By सिद्धेश जाधव | Updated: April 7, 2022 12:45 IST

Samsung Galaxy A33 5G Phone ची किंमत समोर आली आहे. जो 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 8GB RAM आणि IP67 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे.

Samsung नं काही दिवसांपूर्वी भारतात पाच स्मार्टफोन सादर केले होते.परंतु कंपनीनं यातील काही फोन्सची किंमत सांगितली नव्हती. आज Samsung Galaxy A33 5G Phone ची किंमत समोर आली आहे. जो 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 8GB RAM आणि IP67 रेटिंगसह सादर करण्यात आला आहे. Galaxy A33 च्या बेस व्हेरिएंटची किंमत 28,499 रुपये असेल.  

Samsung Galaxy A33 5G India Price 

सॅमसंग गॅलेक्सी ए33 5जी फोनच्या 6 जीबी रॅम व 128 जीबी मेमरी असलेल्या मॉडेलची किंमत 28,499 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल, ज्यात 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मिळते.  

Samsung Galaxy A33 5G चे स्पेसिफिकेशन्स  

फोटोग्राफीसाठी, Samsung Galaxy A33 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रावाईड सेन्सर, 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 5MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगची जबाबदारी 13MP चा फ्रंट कॅमेरा पार पडतो. 

Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुलएचडी+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा इन्फिनिटी-यु डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शनसह येतो. कंपनीनं यात 5nm प्रोसेसवर बनलेला Exynos 1280 चिपसेट दिला आहे. सोबत 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.  

हा डिवाइस Android 12 आधारित OneUI 4.1 वर चालतो. यातील IP67 रेटिंग पाणी आणि धुळीपासून फोनचं संरक्षण करते. पावर बॅकअपसाठी या सॅमसंग फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे.   

 
टॅग्स :samsungसॅमसंगMobileमोबाइलAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान