शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Samsung ने मुंबईत सुरू केलं पहिलं 'ऑनलाईन टू ऑफलाईन' स्टोर; 'हे' 8 झोन्स करणार कमाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:57 IST

मुंबईतील ग्राहकांना Samsung.com/in वरून ऑनलाईन खरेदी करण्‍याची आणि दोन तासांच्‍या आत सॅमसंग बीकेसी येथून त्‍यांनी ऑर्डर केलेली उत्‍पादनं पिक-अप करण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे. 

सॅमसंग  कंपनीने मुंबईतील जिओ वर्ल्‍ड प्‍लाझा मॉलमध्‍ये भारतातील त्‍यांच्‍या पहिल्‍या ऑनलाईन-टू-ऑफलाईन लाइफस्‍टाईल स्‍टोअरचं उद्घाटन केलं आहे. या नवीन स्‍टोअरमध्ये सॅमसंगच्‍या एआय इकोसिस्‍टमच्‍या क्षमतेचा फायदा घेत स्‍मार्टफोन्‍स, टेलिव्हिजन्‍स, रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्‍स आणि इतर उत्‍पादनांचा प्रीमियम पोर्टफोलियो दाखवण्यात आला आहे. 

सॅमसंग बीकेसी एकाच छताखाली प्रिमिअम ग्राहक व तंत्रज्ञानप्रेमींच्‍या गरजांची पूर्तता करण्यासाठी सॅमसंगचा आधुनिक एआय अनुभव देते. मुंबईतील ग्राहकांना Samsung.com/in वरून ऑनलाईन खरेदी करण्‍याची आणि दोन तासांच्‍या आत सॅमसंग बीकेसी येथून त्‍यांनी ऑर्डर केलेली उत्‍पादनं पिक-अप करण्याची देखील सुविधा देण्यात आली आहे. 

ग्राहक सॅमसंग बीकेसी येथे नवीन गॅलॅक्‍सी S24 सिरीजचा अनुभव घेण्‍यासह प्री-बुकिंग करू शकतील. सॅमसंग बीकेसी आठ अद्वितीय लाइफस्‍टाईल झोन्‍समध्‍ये विभागण्‍यात आलं आहे, जे सॅमसंग कनेक्‍टेड मल्‍टी-डिवाईस इकोसिस्‍टमचा भाग म्‍हणून ग्राहकांना देणाऱ्या सोयीसुविधा दाखवेल. 

आठ लाइफस्‍टाईल झोन्‍समध्ये हॉबी रूम, होम ऑफिस, होम अटेलियर, होम कॅफे, कनेक्‍टेड किचन, इंटेलिजंट क्‍लोसेट, प्रायव्‍हेट सिनेमा, मोबाइल झोन यांचा समावेश आहे. आठ झोन्‍समधील सर्व अनुभव एकत्रित करण्‍यासाठी सॅमसंग आपल्‍या लर्न @ सॅमसंग उपक्रमाचा भाग म्‍हणून डिजिअल आर्ट, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, फिटनेस आणि बेकिंग, कुकिंग, म्‍युझिक अशा ग्राहक आवडींसंदर्भात विविध इव्‍हेंट्स व वर्कशॉप्‍सचे देखील आयोजन करेल.  

ग्राहकांसोबत दीर्घकालीन चांगले संबंध निर्माण करण्‍यासाठी स्टोअरमध्‍ये इंटीग्रेटेड सर्व्हिस सेंटर देखील आहे, जेथे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अपॉइन्टमेंट्स घेऊ शकतात आणि त्‍यांच्‍या डिव्हाईसच्‍या सर्व्हिससाठी पिकअपची विनंती करू शकतात. स्‍टोअर ग्राहकांना एकाच दिवसात गॅलॅक्‍सी डिव्हाईसची दुरुस्‍ती आणि रिमोट असिस्‍टंट सर्व्हिस देखील देईल.  

टॅग्स :samsungसॅमसंगMumbaiमुंबईtechnologyतंत्रज्ञान