शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सॅमसंग बिक्सबी व्हर्च्युअल असिस्टंट भारतीय ग्राहकांना सादर

By शेखर पाटील | Updated: August 23, 2017 14:00 IST

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस८ प्लसच्या युजर्ससाठी जाहीर केलेला बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंट आता भारतासह अन्य देशांमधील युजर्सला देण्यात येत आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात फक्त दक्षीण कोरियातील युजर्सलाच हा असिस्टंट सादर करण्यात आला होतायानंतर जुलै महिन्यात अमेरिकन ग्राहकांना इंग्रजी भाषेच्या सपोर्टसह हा असिस्टंट प्रदान करण्यात आला सॅमसंगने अधिकृतपणे येत्या काही दिवसांमध्ये सुमारे २०० देशांमध्ये अपडेट देण्यात येत असल्याची घोषणा केली

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी एस ८ आणि एस८ प्लसच्या युजर्ससाठी जाहीर केलेला बिक्सबी हा व्हर्च्युअल असिस्टंट आता भारतासह अन्य देशांमधील युजर्सला देण्यात येत आहे.यावर्षी सॅमसंग कंपनीने सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस हे दोन मॉडेल सादर केले होते. यात बिक्सबी हा व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीवर चालणारा डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंट असेल असे जाहीर करण्यात आले होते. तथापि, पहिल्या टप्प्यात फक्त दक्षीण कोरियातील युजर्सलाच हा असिस्टंट सादर करण्यात आला होता. अर्थात यात कोरियन भाषेच्या ध्वनी आज्ञावलीचा सपोर्ट प्रदान करण्यात आला होता. यानंतर जुलै महिन्यात अमेरिकन ग्राहकांना इंग्रजी भाषेच्या सपोर्टसह हा असिस्टंट प्रदान करण्यात आला होता. आता लवकरच सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ हे मॉडेल लाँच होणार असून या पार्श्‍वभुमिवर, या असिस्टंटची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. भारतासह इतर देशांमधील युजर्सला याची सुविधा देण्यात आली आहे. सॅमसंगने अधिकृतपणे येत्या काही दिवसांमध्ये सुमारे २०० देशांमध्ये अपडेट देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. बिक्सबी वेकअप आणि बिक्सबी डिटेक्शन या अ‍ॅपच्या अपडेटच्या माध्यमातून ही सुविधा मिळू लागली आहे. काही युजर्सला हे अपडेट मिळाले असून इतरांना क्रमाक्रमाने मिळणार आहे. मात्र हा असिस्टंट जितक्या सफाईदार पध्दतीने कोरियन भाषेत काम करतो तितका इंग्रजीत कार्यक्षम नसल्याची काही युजर्सची ओरड आहे. यातच सध्या तरी सॅमसंग गॅलेक्सी एस ८ आणि एस ८ प्लस या उच्च श्रेणीतल्या मॉडेल्ससाठी याला सादर करण्यात आले असले तरी अन्य मॉडेल्समध्ये याची सुविधा केव्हा मिळणार याची आता युजर्सला प्रतीक्षा आहे. तर सॅमसंग गॅलेक्सी नोट ८ या मॉडेलमध्ये बिक्सबी असेल असे मानले जात आहे.बिक्सबीचे फिचर्सबिक्सबी या डिजीटल व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये व्हाईस कमांड म्हणजेच ध्वनी आज्ञावलीच्या मदतीने विविध फंक्शन्स पार पाडता येतात. यात दैनंदिन शेड्युलपासून ते गुंतागुंतीची कामे फक्त स्मार्टफोनशी बोलून करता येतात. याला सॅमसंग स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केलेल्या विविध अ‍ॅप्सशी जोडता येते. यानंतर या अ‍ॅप्सचे फंक्शनची बिक्सबी वरूनच वापरता येतात. गुगलचा गुगल असिस्टंट आणि अ‍ॅपलच्या सिरीशी बिक्सबीची नेहमी तुलना करण्यात येते.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान