शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रशियाने टेक कंपनी Google ला ठोठावला मोठा दंड, जाणून घ्या कारण काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:46 IST

रशियाच्या एका न्यायालयाने गुगलला ३.८  मिलियन रुबल (जवळपास ३६ लाख रुपये) दंड ठोठावला आहे.

रशियाने अमेरिकन टेक कंपनी गुगलला (Google) मोठा दंड ठोठावला आहे. यूट्यूबवरील (YouTube) व्हिडिओंमुळे गुगलला हा दणका बसला आहे. यूट्यूब हे गुगलच्या मालकीचे आहे. यूट्यूबवर असणाऱ्या काही व्हिडिओंमध्ये रशियन सैनिकांना सरेंडर करण्याच्या पद्धती दाखविल्या जात होत्या. त्यामुळे रशियाच्या एका न्यायालयाने हे बेकायदेशीर असल्याचे सांगत गुगलला दंड ठोठावला आहे.

रशियाच्या एका न्यायालयाने गुगलला ३.८  मिलियन रुबल (जवळपास ३६ लाख रुपये) दंड ठोठावला आहे. दरम्यान, रशिया गेल्या अनेक वर्षांपासून अशा प्रकारचा कंटेंट टेक कंपन्यांकडून हटविण्याचे काम करत आहे, जो त्यांना बेकायदेशीर वाटत आहे. जर एखाद्या कंपनीने हे केले नाही तर तिला दंड आकारला जात आहे. जरी दंडाची रक्कम कमी असली तरी, कंपन्यांना अनेक वेळा दंड आकारण्यात आला आहे. याबद्दल गुगलकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

रशियामध्ये यूट्यूब डाउनलोड स्पीड कमी केला जातोय. सरकारवर टीका करणारा कंटेट लोकांना पाहता येऊ नये म्हणून हे केले जात आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र, रशियाने याचा इन्कार केला आणि म्हटले की, हे गुगलमुळे होत आहे. गुगल आपले डिव्हाइस अपग्रेड करत नाही आहे, ज्यामुळे लोक यूट्यूबवर कंटेंट पाहू शकत नाहीत.

दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुगलचा अमेरिकन सरकारचे एक टूल म्हणून उल्लेख केला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांनी म्हटले होते की, गुगल हे अमेरिकन सरकारचे एक टूल आहे आणि त्याचा वापर राजकारणासाठी केला जात आहे.

याआधी सर्वात मोठा दंड ठोठावला होतागेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रशियाने गुगलवर आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड ठोठावला होता. खरंतर, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, यूट्यूबने आपल्या प्लॅटफॉर्मवर रशियाच्या सरकारी मीडियावर बंदी घातली होती. त्यामुळे रशियाने गुगलवर मोठा दंड ठोठावला होता. ही रक्कम संपूर्ण जगाच्या GDP पेक्षा जास्त होती.

टॅग्स :russiaरशियाtechnologyतंत्रज्ञानgoogleगुगल