शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

फ्लिपकार्ट शॉपिंग पोर्टलवर 'रिपब्लिक डे सेल'

By शेखर पाटील | Updated: January 17, 2018 14:17 IST

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने 'रिपब्लीक डे सेल'ची घोषणा केली असून यात विविध प्रॉडक्टवर अतिशय आकर्षक अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत. 

फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने 'रिपब्लीक डे सेल'ची घोषणा केली असून यात विविध प्रॉडक्टवर अतिशय आकर्षक अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत.  अमेझॉनने नुकतीच ग्रेट इंडियन सेलची घोषणा केली आहे. याला आव्हान देण्यासाठी फ्लिपकार्ट हे शॉपींग पोर्टलदेखील सरसावले असून त्यांच्यातर्फे 'रिपब्लीक डे सेल' जाहीर करण्यात आला आहे. हा सेल २१ ते २३ जानेवारीच्या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या सेलच्या दरम्यान फ्लिपकार्ट पोर्टलतर्फे स्मार्टफोन, लॅपटॉप, टिव्ही आदींसह अन्य उपकरणांवर अतिशय आकर्षक असे डिस्काऊंट प्रदान करण्यात येणार आहेत. यात सिटीबँकचे क्रेडिट वा डेबिट कार्डचा वापर करणार्‍यांना १० टक्के सवलत मिळणार आहे. फ्लिपकार्ट पोर्टलतर्फे ग्राहकांना आतापासूनच विशलिस्ट तयार करण्याचे सूचित करण्यात आले असून या प्रॉडक्टवर जाहीर केलेल्या ऑफर्सशिवाय विशेष सवलत मिळणार आहे हे विशेष.स्मार्टफोनचा विचार केला असता अनेक मॉडेल्स हे सवलतीत मिळणार आहेत. यात गुगलचा पिक्सेल २ एक्सएल हा स्मार्टफोन ४८,९९९ रूपयात उपलब्ध करण्यात आला आहे. तर एचडीएफसी क्रेडिट कार्डचा वापर करणार्‍यांना अतिरिक्त १० टक्के सवलत मिळेल. सॅमसंग गॅलेक्सी एस७ हे मॉडेल अवघ्या २६,९९० रूपयात (मूळ मूल्य ४६,०००) मिळेल. तर शाओमीचा मी मिक्स २ हा स्मार्टफोन २९,९९९ रूपयात ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर मिड रेंजमधील शाओमी रेडमी नोट ४ (४जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज); लेनोव्हो के८ प्लस, मोटो जी५ प्लस; सॅमसंग गॅलेक्सी ऑन नेक्स्ट (६४ जीबी व्हेरियंट); इन्फीनिक्स झीरो फोर; पॅनासोनिक एल्युगा ए३ आदी स्मार्टफोनही सवलतीच्या दरात मिळतील.फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलने अद्याप टिव्ही, लॅपटॉप तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर नेमका किती डिस्काऊंट मिळेल याची माहिती जाहीर केलेली नाही. तथापि, या उत्पादनांवरही आकर्षक ऑफर्स मिळतील असे मानले जात आहे. अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या आसपासच्या कालखंडात फ्लिपकार्ट आणि अमेझॉन या शॉपींग पोर्टल्समध्ये जोरदार चुरस निर्माण होणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टtechnologyतंत्रज्ञान