शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

मोटो जी 5 एस प्लसच्या मूल्यात पुन्हा कपात

By शेखर पाटील | Updated: March 14, 2018 13:48 IST

मोटोरोला कंपनीने आपल्या मोटो जी५ एस प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा २ हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे.

मोटोरोला कंपनीने आपल्या मोटो जी५ एस प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा २ हजार रूपयांची कपात करण्याचे जाहीर केले आहे. दिवसोदिवस स्मार्टफोनचे मूल्य कमी होत आहे. यामुळे आधीच बाजारपेठेत उपलब्ध असणार्‍या मॉडेल्सला स्पर्धेत टिकून राहण्यात अडचणी येत असतात. यावर मात करण्यासाठी बहुतांश कंपन्या मूल्य कपातीचा मार्ग पत्करत असल्याचे आधीच अधोरेखित झाले आहे. या अनुषंगाने लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोला कंपनीने आपल्या जी५ एस प्लस या मॉडेलच्या मूल्यात कपात जाहीर केली आहे. मोटो जी५एस प्लस हे मॉडेल भारतीय बाजारपेठेत १५,९९९ रूपये मूल्यात सादर केले होते. यात मध्यंतरी हजार रूपयांची कपात करण्यात आली आहे. तर आता याचे मूल्य पुन्हा दोन हजारांनी कमी करण्यात आल्यामुळे आता हा स्मार्टफोन ग्राहकांना १२,९९९ रूपयात आहे. 

मोटो जी ५ एस प्लस या स्मार्टफोनमधील फुल एचडी डिस्प्ले हा ५.७ इंच आकारमानाचा असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण देण्यात आले आहे. यात ऑक्टा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६२५ हा प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम ४ जीबी असून स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. याच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असून याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी मोटो जी ५ प्लस या मॉडेलमध्ये ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात रॅपीड चार्जींगसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा आहे.  यात कनेक्टिव्हिटीमध्ये वरील सर्व पर्यायांसोबत एनएफसी हे अतिरिक्त फिचर देण्यात आले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल