शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

हाय रिफ्रेश रेट असेलेल्या जबराट 4K डिस्प्लेसह Redmi Smart TV X 2022 लाँच; इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: October 21, 2021 15:12 IST

Xiaomi Redmi Smart TV X 2022 Launch Price Specs and Details: Redmi Smart TV X 2022 लाईनअप 55-inch, 120Hz Refresh Rate, 4K Display आणि Dolby Atmos सपोर्टसह सादर करण्यात आली आहे.

शाओमीने आपल्या सब-ब्रँड Redmi अंतर्गत Redmi Smart TV X 2022 सादर केली आहे. या SmartTV ची खासियत म्हणजे यातील 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले आहे. गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या Redmi X series ची नवीन लाईनअप कंपनीने चीनमध्ये सादर केली आहे. शाओमीने Redmi Smart TV X 2022 टीव्हीचे 55-inch आणि 65-inch असे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत.  

Redmi Smart TV X 2022 चे स्पेसिफिकेशन्स 

कंपनीने Redmi Smart TV X 2022 स्मार्ट टीव्ही फुल मेटल डिजाइनसह सादर केली आहे. तसेच यात बॅकलाईट पॅनलचा वापर करण्यात आला आहे. हा टीव्ही पॅनल 4K (3840×2160 पिक्सल) रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. तसेच कंपनीने यात 120Hz चा हाय रिफ्रेश रेट दिला आहे. त्याचबरोबर 6.5ms रिस्पॉन्स टाइम, 10-bit कलर डेप्थ, 94% P3 कलर गमुट, FreeSync आणि Dolby Vision असे फीचर्स मिळतात.  

चांगल्या ऑडिओ क्वॉलिटीसाठी कंपनीने या टीव्ही मध्ये 4 स्पिकरचा वापर केला आहे. Redmi Smart TV X 2022 मध्ये Dolby Atmos सपोर्ट मिळतो. तसेच कनेक्टिविटीसाठी HDMI 2.0 (eARC) पोर्ट, एक HDMI 2.1 (4K120Hz) पोर्ट, एक AV, एक ATV/DTMB, दोन USB पोर्ट, एक S/PDIF, एक RJ-45 आणि चार मायक्रोफोन देण्यात आले आहेत. 

या टीव्ही लाईनअपमध्ये कंपनीने MediaTek MTK 9650 चिपसेटचा वापर केला आहे. ज्यात क्वाड कोर A73 1.5GHz CPU आणि Mali-G52 2EE MC1 GPU देण्यात आले आहेत. तसेच हा टीव्ही 3GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.  

Redmi Smart TV X 2022 ची किंमत 

Redmi Smart TV X 2022 स्मार्ट टीव्हीच्या 55 इंचाच्या मॉडेलची किंमत 2,999 युआन (सुमारे 35,100 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर या टीव्हीच्या 65 इंचाच्या मॉडेलसाठी 3,499 युआन म्हणजे जवळपास 41,000 रुपये द्यावे लागतील. ही टीव्ही लाईनअप भारतात पदार्पण करेल कि नाही हे मात्र आता सांगता येणार नाही.  

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञान