शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

Redmi Phone: बजेट स्मार्टफोन्सचा बॉस येतोय; लाँच पूर्वीच Redmi Note 11 आणि Redmi Note 11S ची किंमत लीक

By सिद्धेश जाधव | Updated: January 31, 2022 19:20 IST

Redmi Note 11, Note 11S India Price: शाओमी भारतात Redmi Note 11 सीरीज अंतर्गत Note 11 आणि Note 11S असे दोन स्मार्टफोन सादर करणार आहे. आता लाँच पूर्वीच या स्मार्टफोन्सची किंमत समोर आली आहे.

Xiaomi येत्या 9 फेब्रुवारीला भारतात आपली Redmi Note 11 सीरीज लाँच करणार आहे. या सीरिजमधील Redmi Note 11 आणि Redmi Note 11S हे दोन डिवाइस भारतीयांच्या भेटीला येणार आहेत. परंतु आता लाँच होण्याआधीच या स्मार्टफोन्सची किंमत लीक झाली आहे. जागतिक बाजारात मात्र या सीरिजमध्ये Note 11S, Note 11 Pro आणि Note 11 Pro 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.  

Redmi Note 11, Note 11S India Price 

टिपस्टर Yogesh Brar नं दिलेल्या माहितीनुसार, Redmi Note 11 भारतात 13,999 किंवा 14,499 रुपयांमध्ये लाँच करण्यात येईल. तर सीरिजमधील Redmi Note 11S ची भारतीय किंमत 16,999 किंवा 17,499 रुपये असू शकते. ही स्मार्टफोन्सच्या बेस व्हेरिएंटची किंमत असू शकते. एकापेक्षा जास्त व्हेरिएंट देखील बाजारात येऊ शकतात.  

Redmi Note 11 आणि Redmi Note 11s चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 11 आणि Redmi Note 11S वेगवेगळ्या प्रोसेसर, रॅम व्हेरिएंट आणि कॅमेरा सेन्सर्ससह बाजारात आले आहेत. परंतु दोघांचे काही स्पेक्स एकसारखे आहेत, ज्यात डिस्प्लेचा समावेश आहे. दोन्ही फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह सादर करण्यात आले आहेत. ज्यात पंच-होल डिजाईन, 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ची सुरक्षा मिळते.   

हे फोन्स अँड्रॉइड11 आधारित मीयुआय 13 वर चालतात. सिक्योरिटी रेडमी 11 सीरिजमध्ये साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आलं आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात आयआर ब्लास्टर आणि आयपी53 वॉटर रेजिस्टन्स मिळतो. दोन्ही फोन्समधील 5000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.   

प्रोसेसिंग पॉवरसाठी Redmi Note 11 मध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 6GB पर्यंत RAM मिळतो. तर Redmi Note 11S स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो जी96 चिपसेटला सपोर्ट करतो आणि यात 8GB पर्यंत RAM देण्यात आला आहे.   

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 11 आणि नोट 11एस क्वॉड रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात आले आहेत. Redmi Note 11S मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर मिळतो. परंतु Redmi Note 11 50मेगापिक्सलच्या प्रायमरी कॅमेऱ्यासह बाजारात आला आहे. बाकी सेन्सर एकसारखे आहेत ज्यात 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 2 मेगापिक्सल मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एस मॉडेलमध्ये 16 मेगापिक्सलचा सेन्सर आहे, तर रेडमी नोट 11 मध्ये 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.   

हे देखील वाचा:

बंद असलेला फोन देखील करता येईल ट्रॅक; Smartphone हरवल्यास वापरा या सोप्प्या ट्रिक्स

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान