शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Redmi Note 11 Pro मध्ये मिळणार 200MP कॅमेरा? कॉन्सेप्ट रेंडर्स लीक 

By सिद्धेश जाधव | Updated: July 19, 2021 11:35 IST

Redmi Note 11 Pro Concept Renders: Redmi Note 11 Pro कसा दिसले हे LetsGoDigital आणि Technizo Concept मिळून रेंडर्सचे फोटो आणि व्हिडीओ जारी करून दाखवले आहे.

बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन्समध्ये Redmi Note सीरिजचे स्मार्टफोन खूप लोकप्रिय आहेत. या यशामागील एक कारण म्हणजे शाओमी सतत या सीरिजमध्ये नवनवीन फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देत असते. यावर्षी कंपनीने Redmi Note 10 सीरिज सादर केली होती, तर पुढल्या वर्षीच्या सुरुवातीला Redmi Note 11 सीरीज येऊ शकते. आता प्रथमच Redmi Note 11 लाइनअपचे लीक आहे आहे. Technizo Concept आणि LetsGoDigital ने कल्पनेवर आधारित Redmi Note 11 Pro चे कॉन्सेप्ट रेंडर्स प्रकाशित केले आहेत. (Redmi Note 11 lineup is expected to launch in early 2022)

Redmi Note 11 Pro कसा दिसले हे LetsGoDigital आणि Technizo Concept मिळून रेंडर्सचे फोटो आणि व्हिडीओ जारी करून दाखवले आहे. Redmi Note 11 Pro कसा असेल हे फक्त कल्पनेवर आधारित रेंडर्स असून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जेव्हा Redmi Note 11 Pro लाँच होईल तेव्हा त्याची डिजाईन आणि फीचर्स पूर्णपणे वेगळे देखील असू शकतात.  

समोर आलेल्या रेंडर्सनुसार, Redmi Note 11 Pro च्या फ्रंट डिस्प्लेवर वरच्या बाजूला मध्यभागी एक पंच होल दिला जाऊ शकतो. या पंच होलमध्ये सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. या रेंडर्समध्ये फोनच्या मागे रियर कॅमेरा सेटअपसाठी एक आयताकृती उंचवटा मिळू शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये तीन कॅमेरा सेन्सर दिसत आहेत.

Redmi Note 11 Pro कॉन्सेप्ट रेंडर्स व्हिडीओ: 

 

या डिवाइसमध्ये उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटण दिसत आहेत आणि डावीकडे एक सिम कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. Redmi Note 11 Pro च्या रेंडर्समध्ये फोनच्या अग्रभागी 3.5mm ऑडियो जॅक आणि एक स्पिकर ग्रिल देण्यात आली आहे आणि तळाला अजून एक स्पिकर ग्रिल आणि एक USB टाइप-C पोर्ट आहे. Redmi Note 10 Pro प्रमाणे हा फोन ग्लास/ग्लॉसी बॅक पॅनल मिनिमलिस्टिक दिसत आहे. Redmi Note 11 Pro चे रेंडर्स ब्लॅक आणि सिल्वर रंगात सादर करण्यात आले आहेत.  

या रेंडर्समध्ये Redmi Note 11 Pro ची डिजाइन खूप आकर्षक दिसत आहे. परंतु वर सांगितल्याप्रमाणे ही फक्त एक कल्पना आहे, लाँच होणारा Redmi Note 11 Pro वेगळा असू शकतो.  

टॅग्स :xiaomiशाओमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड