शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

Amazon Great Indian Festival: स्वस्तात मस्त स्मार्टफोनवर मिळतोय डिस्काउंट; 9,000 रुपयांच्या आत मिळणार हे बेस्ट फोन

By सिद्धेश जाधव | Updated: October 7, 2021 16:08 IST

Amazon Great Indian sale smartphone offers: आज या लेखात आपण 9,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या बेस्ट स्मार्टफोनची माहिती घेणार आहोत, जे डिस्काउंटसह Amazon Great Indian Festival सेलमधून विकत घेता येतील.  

अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल 2021 मध्ये अनेक ऑफर्स मिळत आहेत. परंतु या लेखात आपण बजेट सेगमेंटमधील स्मार्टफोनवरील ऑफर्स पाहणार आहोत. इथे तुम्हाला सेलमध्ये 9,000 रुपयांच्या आत मिळणाऱ्या बेस्ट स्मार्टफोनची माहिती देणार आहोत. चला जाणून घेऊया Budget Phones वरील बेस्ट ऑफर्स.  

Nokia C01 Plus 4G 

6,999 रुपयांचा Nokia C01 Plus चा 2GB रॅम आणि 16GB स्टोरेज मॉडेल सेलमध्ये 6,198 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा 5.45-इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने यात Unisoc SC9863a प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. नोकिया सी01 प्लसमध्ये 3,000mAh ची बॅटरी मिळते.  

Redmi 9A 

Redmi 9A फोनच्या 2GB रॅम आणि 32GB व्हेरिएंटची किंमत 7,496 रुपये आहे, परंतु अ‍ॅमेझॉन सेल अंतर्गत हा फोन 6,799 रुपयांमध्ये मिळत आहे. या फोनमध्ये 6.53 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी25 चिपसेट मिळतो. 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. Redmi 9A मध्ये 5,000 एमएएचची बॅटरी आहे.  

Realme narzo 50i 

Realme Narzo 50i च्या 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,999 रुपये आहे, परंतु सेल मध्ये तुम्ही हा फोन 7,499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.  

Realme Narzo 50i मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये Unisoc 9863 चिपसेट प्रोसेसिंगचे काम करतो. फोनमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची बिल्टइन स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डने 256GB पर्यंत वाढवता येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित Realme UI Go एडिशन चालतो.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा एआय रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. तर या फोनच्या फ्रंटला 5-मेगापिक्सलचा एआय सेल्फी शुटर मिळतो. Realme Narzo 50i मध्ये 5,000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 43 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.   

Tecno Spark 7T 

Tecno Spark 7T फोनचा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 10,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. परंतु फेस्टिव्ह सेलमध्ये या फोनसाठी 8,499 रुपये मोजावे लागतील. या फोनमध्ये 6.52-इंचाचा एचडी+ आयपीएस डिस्प्ले मिळतो. कंपनीने डिवाइसला मीडियाटेक हीलियो जी35 प्रोसेसरची पॉवर दिली आहे. फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि एक AI कॅमेरा आहे. तर फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर आहे. या फोनमध्ये 6,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडrealmeरियलमीxiaomiशाओमी