शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Budget Smartwatch: नव्या ढंगात येणार बजेट फ्रेंडली Realme Watch 2 स्मार्टवॉच; स्पेसिफिकेशन देखील भन्नाट 

By सिद्धेश जाधव | Updated: November 20, 2021 19:52 IST

Budget Smartwatch Realme Watch 2: जुलैमध्ये आलेल्या Realme Watch 2 चा खास एडिशन लवकरच भारतात सादर होणार आहे.  

Budget Smartwatch: रियलमीने यावर्षी जुलैमध्ये Realme Watch 2 भारतात लाँच केली होती. लाँचच्या वेळी या स्मार्टवॉचचा फक्त एकच ब्लॅक कलर व्हेरिएंट उपलब्ध झाला होता. आता कंपनी या स्मार्टवॉचमध्ये नवीन रंग भरणार आहे. कंपनी रियलमी वॉच 2 चा गोल्ड कलर ऑप्शन सादर करणार आहे, अशी माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे.  

91Mobiles च्या रिपोर्टनुसार Realme Watch 2 चा स्पेशल गोल्ड कलर ऑप्शन लवकरच बाजारात उपलब्ध होऊ शकतो. हा खास स्मार्टवॉच या महिन्यात किंवा यावर्षीच्या अखेरपर्यंत सादर केला जाईल. या नव्या व्हेरिएंटमध्ये कलर वगळता बाकी स्पेक्स आणि फीचर्स बदलणार नाहीत अशी अपेक्षा आहे.  

Realme Watch 2 चे स्पेसिफिकेशन्स   

Realme Watch 2 मध्ये 1.4 इंचाचा एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले 320x320 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. या स्मार्टवॉच हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटर देण्यात आला आहे. यात 90 स्पोर्ट्स मोड आहेत. हा स्मार्टवॉच Bluetooth v5 आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे. या रियलमी स्मार्टवॉचमधील 315mAh ची बॅटरी 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते.   

Realme Watch 2 ची किंमत  

Realme Watch 2 स्मार्टवॉच 3,499 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा डिवाइस Realme.com आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानHealthआरोग्य