शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

80W फास्ट चार्जिंगसह Realme Q5 Pro ची एंट्री; पावरफुल फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 13GB RAM 

By सिद्धेश जाधव | Updated: April 20, 2022 19:24 IST

64MP Camera, 80W fast charging आणि Snapdragon 870 चिपसेट असलेला Realme Q5 Pro चीनमध्ये आला आहे. .

Realme नं काही दिवसांपूर्वी आपल्या क्यू सीरिजचा विस्तार करत एक स्मार्टफोन सादर केला होता. आज कंपनीनं दोन नव्या हॅंडसेट्सची भर या सीरिजमध्ये टाकली आहे. चीनमध्ये Realme Q5 आणि Realme Q5 Pro हे दोन डिवाइस ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. यातील 64MP Camera, 80W fast charging आणि Snapdragon 870 चिपसेट असलेल्या Realme Q5 Pro ची माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.  

Realme Q5 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी क्यू5 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 5जी चिपसेट दिला आहे. . ग्राफिक्ससाठी एड्रेनो 650 जीपीयू मिळतो. फोन 5 जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो त्यामुळे एकूण 13 जीबी रॅमची ताकद मिळवता येते.  

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. सोबत 8 मेगापिक्सलची सुपर वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. तर 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुरक्षा देण्यात आली आहे. रियलमी क्यू5 प्रो मधील 5,000एमएएच बॅटरी 80 वॉट फास्ट चार्जिंगलस सपोर्ट करते.  

Realme Q5 Pro ची किंमत 

रियलमी क्यू5 प्रो स्मार्टफोनच्या 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोेरेज मॉडेलची किंमत 1799 युआन (सुमारे 21,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसाठी 1999 युआन (सुमारे 23,800 रुपये) तर 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजसाठी 2199 युआन (जवळपास 26,200 रुपये) द्यावे लागतील. फोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र मिळाली नाही.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन