शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रेडमीवर घणाघाती वार! शानदार कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरीसह Realme च्या सुंदर मोबाईलची एंट्री 

By सिद्धेश जाधव | Updated: April 25, 2022 15:25 IST

रियलमी नारजो 50ए स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.  

रियलमीच्या Narzo 50 सीरीजमधील चौथा स्मार्टफोन भारतात आला आहे. Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन देशात 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh च्या बॅटरीसह उतरला आहे. विशेष म्हणजे हा सुंदर स्मार्टफोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला होता. गेल्या आठवड्यात कंपनीच्या वेबसाईटवर लिस्ट झालेला हा डिवाइस आता अधिकृतपणे लाँच करण्यात आला आहे.  

Realme Narzo 50A Prime चे स्पेसिफिकेशन्स  

या रियलमी फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो 600निट्स पोक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं हा फोन अँड्रॉइड 11 ओएस बेस्ट रियलमी युआय आर एडिशनसह सादर केला आहे. यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यांतची इंटरनल मेमरी मिळते.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.   

Realme Narzo 50A Prime किंमत 

Realme Narzo 50A Prime स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आले आहेत. यातील बेस व्हेरिएंट 4GB रॅम व 64GB स्टोरेजसह 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन फ्लॅश ब्लॅक आणि फ्लॅश ब्लू कलरमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि अ‍ॅमेझॉनवरून 28 एप्रिलपासून विकत घेता येईल.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल