शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

5,000mAh बॅटरी आणि 48 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह आला Realme Narzo 30 4G; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

By सिद्धेश जाधव | Updated: June 24, 2021 15:02 IST

Realme Narzo 30 4G Price: Realme Narzo 30 4G ची किंमत 12,499 रुपयांपासून सुरु होते, हा फोन 29 जूनपासून फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध होईल.

कित्येक दिवस चर्चेत राहिल्यानंतर अखेरीस Realme ने भारतात आपली Narzo 30 सीरीज लाँच केली. कंपनीने या सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत, ज्यांची Realme Narzo 30 4G आणि Realme Narzo 30 5G अशी आहेत. यातील Realme Narzo 30 4G ची माहिती आपण या लेखात बघणार आहोत. Realme Narzo 30 5G बाबत जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.  

Realme Narzo 30 4G ची डिजाइन  

Realme Narzo 30 4G मध्ये पंच हॉल कॅमेरा कटआउट देण्यात आली आहे. फोनच्या मागे व्हर्टिकल कॅमेरा सेटअप मिळतो. उजवीकडे पावर बटणमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि डावीकडे वॉल्यूम रॉकर आहे. बॅक पॅनलवर रेसिंग डिजाइन पॅटर्नमध्ये रियलमी नारजोचा लोगो देण्यात आला आहे. 

Realme Narzo 30 4G चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Narzo 30 4G मध्ये 6.5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080×2400 FHD+, आहे. फोनमध्ये मीडियाटेकचा Helio G95 चिपसेट मिळतो. Narzo 30 4G स्मार्टफोन 4GB आणि 6GB रॅमसह 64GB आणि 128GB स्टोरेजसह सादर केला गेला आहे. रियलमीच्या या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह देण्यात आली आहे. या फोनमध्ये Android 11 आधारित Realme UI 2.0 आहे. 

फोटोग्राफीसाठी Realme Narzo 30 4G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. सोबत 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाइट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. Narzo 30 4G 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Realme Narzo 30 4G ची किंमत 

Realme Narzo 30 4G स्मार्टफोन 4GB रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज अश्या दोन व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. यातील छोट्या व्हेरिएंटची किंमत 12,499 रुपये तर मोठा व्हेरिएंट 14,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  

Realme Narzo 30 4G स्मार्टफोन 29 जूनपासून फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या वेबसाइटवरून विकत घेता येईल. या सेलमध्ये या स्मार्टफोनवर 500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. 

टॅग्स :realmeरियलमीAndroidअँड्रॉईडSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान