शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

Realme उघडला प्रोडक्टचा पेटारा! 4K Smart Google TV Stick, Realme Brick ब्लूटूथ स्पिकरसह गेमिंग अ‍ॅक्सेसरीज भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: October 13, 2021 18:35 IST

Realme 4K Smart Google TV Stick Price In India: रियलमीने Realme 4K Smart Google TV Stick, Realme Brick Bluetooth Speaker आणि तीन नवीन स्मार्टफोन गेमिंग अ‍ॅक्सेसरीज भारतात सादर केल्या आहेत.

रियलमीने भारतात Realme GT Neo 2 स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्ट आज भारतात सादर केले आहेत. यात Realme 4K Smart Google TV Stick, Realme Brick Bluetooth Speaker आणि तीन नवीन स्मार्टफोन गेमिंग अ‍ॅक्सेसरीजच समावेश आहे. तसेच कंपनीने Realme Buds Air 2 चा नियो कलर व्हेरिएंट देखील देशात लाँच केला आहे.  

Realme 4K Smart Google TV Stick 

Realme 4K Smart Google TV Stick हा कंपनीचा देशातील पहिला स्ट्रीमिंग डिवाइस आहे. या स्टिकच्या मदतीने नॉन-स्मार्ट टीव्हीला स्मार्ट टीव्ही बनवता येईल. ही 4K स्मार्ट स्टिक 60fps आणि HDR10+ व्हिडीओ स्ट्रीमला सपोर्ट करते. टीव्हीला कनेक्ट करण्यासाठी HDMI 2.1 पोर्टचा वापर करावा लागेल. यात Google Play Store, Play services, Google Assistant आणि बिल्ट इन क्रोमकास्ट अशा गुगल सर्व्हिस मिळतात.  

या टीव्ही स्टिकमध्ये 2GB RAM आणि 8GB स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचबरोबर ARM Cortex-A35 CPU, आणि ड्युअल कोर GPU मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात Bluetooth 5, Wi-Fi, आणि इन-बिल्ट मायक्रोफोन असलेला रिमोट देण्यात आला आहे. Realme 4K Smart Google TV Stick ची किंमत 3,999 रुपये ठेवण्यात आली आहे. लाँच ऑफर अंतगर्त Flipkart आणि Realme.com वरून हा डिवाइस 2,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme Brick Bluetooth Speaker 

20W डायनॅमिक बेस बूस्ट ड्राईव्हरसह कंपनीने Realme Brick ब्लूटूथ स्पिकर सादर केले आहेत. 360-डिग्री स्टीरियो साउंड इफेक्टसह सादर करण्यात आलेले हे स्पीकर 5,200mAh च्या बॅटरीसह बाजारात आले आहेत. यात सिंगल चार्जमध्ये 14 तासांचा बॅकअप मिळतो. Realme Brick Bluetooth Speaker ची किंमत 2,999 रुपये आहे.  

Realme गेमिंग अ‍ॅक्सेसरीज 

रियलमीने भारतीय बाजारात तीन नवीन गेमिंग अ‍ॅक्सेसरीज सादर केल्यात आहेत. यात Realme cooling back clip Neo, Type-C SuperDart गेमिंग केबल आणि मोबाईल गेमिंग ट्रिगरचा समावेश आहे. नायलॉन मटेरियलपासून बनलेल्या गेमिंग केबलची खासियत म्हणजे यात 7.6mm नॅरो एल्बो डिजाइन देण्यात आली आहे. जी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Type-C SuperDart गेमिंग केबलची किंमत 599 रुपये आहे. 

गेमिंग ट्रिगर जिंक अलॉय मटेरियलपासून बनवण्यात आले आहेत, जे लेटेंसी फ्री गेमिंगचा अनुभव देतात. या मोबाईल गेमिंग ट्रिगरची किंमत 699 रुपये आहे. तर रियलमीची कूलिंग क्लिप रॅपिड कूलिंग देतात, ज्याची किंमत 999 रुपये आहे.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञान