फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात

By सिद्धेश जाधव | Published: March 29, 2022 08:16 PM2022-03-29T20:16:20+5:302022-03-29T20:16:44+5:30

Realme GT Neo 3 फोन 150W फास्ट चार्जिंगसह चीनमध्ये लाँच झालेला स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येतोय.

Realme GT Neo 3 May Launch In India By May Spotted On BIS Website   | फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात

फीचर्स पाहून सॅमसंग-शाओमीनं घेतला धसका; 5 मिनिटांत अर्धा चार्ज होणारा स्मार्टफोन येतोय भारतात

Next

Realme GT Neo 3 स्मार्टफोननं चीनमध्ये काही दिवसांपूर्वी पदार्पण केलं होतं. आता हा फोन भारतात येणार असल्याची बातमी आली आहे. कारण हा रियलमी फोन BIS (ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) या सर्टिफिकेशन वेबसाईटवर दिसला आहे. या लिस्टिंगनंतर या फोनची लाँच टाइमलाईन देखील लीक करण्यात आली आहे.  

टिप्सटर अभिषेक यादवच्या माहितीनुसार BIS आणि SIRIM वर लिस्ट Realme GT Neo 3 स्मार्टफोन लवकरच भारतात येईल. अभिषेकनं दिलेल्या लाँच टाइमलाईननुसार हा फोन भारतात एप्रिल किंवा मे मध्ये लाँच केला जाऊ शकतो. परंतु अजूनही रियलमीनं याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही.  

Realme GT Neo 3 चे स्पेसिफिकेशन्स  

रियलमी जीटी नियो 3 टेक मंचावर 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पंच-होल पॅनलला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे. 

Realme GT Neo 3 मध्ये अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी माली जी610 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. 

Realme GT Neo 3 च्या मागे असेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते. 

Realme GT Neo 3 चे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीडचे दोन मॉडेल आहेत. यातील 4,500एमएएचच्या बॅटरीसह 150वॉट फास्ट चार्जिंग मिळते. तर 5,000एमएएच बॅटरी असलेला मॉडेल 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 1,999 युआन (सुमारे 24,000) पासून सुरु होते.   

Web Title: Realme GT Neo 3 May Launch In India By May Spotted On BIS Website  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.