शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

तयार राहा! Realme चे दोन बाहुबली स्मार्टफोन्स येतायत; 5 मिनिटांत 50 टक्के चार्ज होणार फोन

By सिद्धेश जाधव | Updated: April 9, 2022 17:00 IST

Realme GT Neo 3 आणि Realme GT 2 हे दोन स्मार्टफोन भारतीयांच्या भेटीला येणार आहे.  

Realme आपल्या जीटी सीरिजमध्ये फ्लॅगशिप ग्रेड स्मार्टफोन सादर करते. या सीरिजमधील सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन Realme GT 2 Pro नुकताच भारतात आला आहे. आता कंपनीनं माहिती दिली आहे की, कंपनीच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त Realme GT 2 स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल. तसेच सीईओ माधव सेठ यांनी ट्विट करून Neo आणि 150W चा उल्लेख केला आहे. त्यामुळे Realme GT Neo 3 देखील भारतात येण्याची शक्यता आहे.  

हे फोन्स याआधी चीनमध्ये लाँच झाले आहेत. त्यामुळे यांच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती उपलब्ध आहे. Realme GT 2 मध्ये गेल्यावर्षीचा फ्लॅगशिप प्रोसेसर आणि दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत. तर Realme GT Neo 3 मध्ये मीडियाटेकचा नवा फ्लॅगशिप प्रोसेसर मिळतो. तसेच यातील 150W फास्ट चार्जिंग फक्त 5 मिनिटांत 50 टक्के फोन चार्ज करते.  

Realme GT 2 चे स्पेसिफिकेशन्स 

रियलमी जीटी 2 स्मार्टफोन 6.62 इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट आणि एड्रेनो 660 जीपीयूला देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंत UFS 3.1 इंटरनल स्टोरेज मिळेल. 

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी 2 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनी आईएमएक्स776 सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स471 सेन्सर फ्रंट कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे. 

Realme GT 2 5G फोन बेसिक कनेक्टिव्हिटीफीचर्ससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 2,500एमएएचच्या दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत. ज्यात मिळून 5,000एमएएचची पॉवर देतात. ही बॅटरी 65वॉट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.   

Realme GT Neo 3 चे स्पेसिफिकेशन्स

Realme GT Neo 3 मध्ये अँड्रॉइड 12 ओएस आधारित रियलमी युआय 3.0 आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनी मीडियाटेक डिमेनसिटी 8100 चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी माली जी610 जीपीयूचा वापर करण्यात आला आहे. सोबत 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. 

रियलमी जीटी नियो 3 टेक मंचावर 6.7 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह आला आहे. जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1000हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या पंच-होल पॅनलला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा आहे.  

Realme GT Neo 3 च्या मागे असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा टेली मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगर सेन्सरची सुरक्षा मिळते.  

Realme GT Neo 3 चे वेगवेगळ्या बॅटरी आणि चार्जिंग स्पीडचे दोन मॉडेल आहेत. यातील 4,500एमएएचच्या बॅटरीसह 150वॉट फास्ट चार्जिंग मिळते. तर 5,000एमएएच बॅटरी असलेला मॉडेल 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड