शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

धमाकेदार Realme GT 2 Pro येतोय भारतीयांच्या भेटीला; फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्ससह होऊ शकतो लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 14:46 IST

Realme GT 2 Pro 5G Phone Launch Price and Details: लवकरच Realme GT 2 Pro नावाचा नवीन फोन भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाईल. हा आगामी रियलमी जीटी सीरीजमधील स्मार्टफोन IMEI च्या डेटाबेसवर लिस्ट करण्यात आला आहे.

रियलमीने यावर्षी GT सीरीजमध्ये अनेक स्मार्टफोन लाँच केले आहेत. ही सीरिज कंपनीच्या जुन्या ‘X’ सीरिजची जागा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या सीरिजमधील Realme GT Neo 2 काही दिवसांपूर्वी भारतात सादर करण्यात आला आहे. आता लवकरच Realme GT 2 Pro नावाचा नवीन फोन भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाईल, अशी बातमी आली आहे. रियलमीचा हा फोन IMEI डेटाबेसवर लिस्ट करण्यात आला आहे. 

फ्लॅगशिप फोन असू शकतो Realme GT 2 Pro  

काही दिवसांपूर्वी Realme GT 2 Pro स्मार्टफोन कंपनीच्या वेबसाईटवर देखील दिसला होता. ऑफिशियल वेबसाईटच्या लिस्टिंगमुळे हा फोन लवकरच लाँच होईल, असे दिसत आहे. त्यानंतर आता हा आगामी रियलमी जीटी सीरीजमधील स्मार्टफोन IMEI च्या डेटाबेसवर लिस्ट करण्यात आला आहे. इथे हा फोन Realme RMX3301 या मॉडेल नंबरसह दिसला आहे. या लिस्टिंग व्यतिरिक्त सध्या तरी या फोनच्या स्पेसीफाकेशन्सची इतर कोणतीही माहिती मिळाली नाही.  

गेल्या महिन्यात भारतात आलेल्या Realme GT Neo 2 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme GT Neo 2 स्मार्टफोन Samsung E4 Display सह बाजारात आला आहे. या फुलएचडी+ रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेचा आकार 6.62 इंच आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश, 600हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1300निट्स ब्राईटनेस आणि 500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो, तसेच या डिस्प्लेला कोर्निंग गोरिल्ला ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे.    

Realme GT Neo 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 हा 5G चिपसेट आहे. हा मोबाईल अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 वर चालतो. या डिवाइसमध्ये 12GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 storage स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन 7GB व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो त्यामुळे यातील एकूण RAM 19 GB पर्यंत वाढवता येतो.     

रियलमी जीटी नियो2 मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64MP चा मुख्य सेन्सर, 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची पोर्टरेट लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह यात 65W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान